Faijpur

फैजपूर ला पं दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

फैजपूर ला पं दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

सलीम पिंजारी

फैजपूर भारतीय जनता पार्टी ची विशेष बैठकीचे आयोजन दि.25 सप्टेंबर 2020 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न उपबाजार समिती फैजपूर सभागृहात करण्यात आले या प्रसंगी सर्व प्रथम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व.सुरेश अंगडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जनसंघाचे अध्यक्ष तथा प्रखर राष्ट्रभक्ती चे उपासक स्व .पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या तैलचित्रास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पक्ष विचारधारा व पंडित दिनदयालजी यांच्या जीवनचरित्राविषयी सरचिटणीस संजय सराफ व माजी नगराध्यक्ष पी के चौधरी यांनी समयोचित मनोगतात म्हणाले की एकात्म मानवतावाद व अंत्योदय हे विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अग्रक्रमाने मांडले त्यांचे हे प्रेरणादायी विचार आत्मसाद करून कार्यकर्त्यांनी विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून सामान्य माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,केंद्रीय कृषिधोरणाचे स्वागत करून या बाबी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शेतकरी व सर्व सामान्य जनतेला कृषी धोरणाचे फायदे समावून देण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी पं स यावल माजी सभापती भरत भाऊ महाजन, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, माजी नगराध्यक्ष पि के चौधरी ,निलेश राणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे ,भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, रवींद्र होले,संजय रल, रघुनाथ कुंभार, पप्पू चौधरी, किरण चौधरी, जितेंद्र वर्मा, दीपक राजपूत ,रामा होले, संजय भावसार,
यासह शहरातील भाजपा सर्व आजी-माजी- नगरसेवक -सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी – शक्ती गटप्रमुख- बूथ प्रमुख कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button