?️ माफीचा साक्षीदार आणि वासूची सासू मधील वासूची एक्झिट…हृदय विकारामुळे निधन…
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले. अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
90 च्या दशकामध्ये मराठीमध्ये अनेक ग्लॅमरस कलाकार होते. सदाबहार आणि लोकप्रिय अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते 68 वर्षांचे होते.
एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती. 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यापूर्वी ते नाटकांतून काम करत होतेच. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार आदी अनेक चित्रपटांत काम केलं. शिवाय रंगभूमीशीही त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली. यात सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुज आहे तुजपाशी या नाटकांचा त्यात समावेश होतो. तुज आहे तुजपाशी हे नाटक तर विक्रमी म्हणायला हवं.
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते. ‘बंदिवान मी या संसारी’ हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता. ‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. ‘लफडा सदन’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘दिवा जळू दे सारी रात’ यांसारखी नाटके देखील त्यांनी गाजवली होती. अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते.
अविनाश खर्शीकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. मात्र अनोख्या विनोदी शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. 90च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत जोरात चर्चा सिनेसृष्टीत होती. एखाद्या द0हिंदी चित्रपटातील अभिनेत्यासारखा लूक असणारे ते मोजक्या मराठी अभिनेत्यांमध्ये एक होते. सदाबहार अविनाश खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ महत्त्वाची भुमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते. ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली ‘श्याम’ची भूमिका विशेष गाजली होती.तर अभिनय सम्राट दिलीप प्रभावळकर या दिग्गज अभिनेत्या समोर ताकदीचा अभिनय वासूची सासू ह्या अत्यन्त प्रसिद्ध विनोदी नाटकात वासू ची भूमिका सादर केली होती.






