Maharashtra

महाराष्ट्र कमांडो फोर्स जवानाना मनसे कडून मदतीचा हात

महाराष्ट्र कमांडो फोर्स जवानाना मनसे कडून मदतीचा हात

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर मधील लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र कमांडो फोर्स दलाचे जवान काम करत आहेत. कोरोना विरोधी लढाईत कमांडोचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून आज महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मदतीचा हात पुढे करून त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञा व्यक्त केली.नेहमीच अत्यंत तुटपुंज्या मानधनावर महाराष्ट्र कमांडो फोर्स दलाचे हे जवान काम करतात. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून हे रात्रंदिवस लोकांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. लाॅकडाऊनच्या काळात काम करत असताना त्यांच्या कुटुंबियांना ही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अशा संकट काळात महाराष्ट्र कंमाडो फोर्स जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे बंधू सारखे धावून आले आहेत. माणूसकीच्या नात्याने दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरातील महाराष्ट्र कमांडो फोर्स दलाच्या जवानाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.आज महाराष्ट्र दिन साध्या पध्दतीने साजरा केला जात असतानाच मनसेने मात्र कोरोना विरोधात लढणार्या महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या जवानांना गव्हू,तांदुळ,साखर,तेल ,चहा पावडरसह इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून महाराष्ट्र दिन साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी कामगारा विषयी असलेली कृतज्ञा ही व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र कमांडो फोर्स चे प्रमुख विशाल देवळे यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप केले. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, ओंकार कुलकर्णी,संजय रणदिवे, तसेच महाराष्ट्र कमांडो फोर्स चे जवान महेश रणदिवे, राम गायकवाड, बंडू मस्के, संजय कासार, गोपाळ कोपुरे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button