Nandurbar

अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अक्कलकुवा शहरात सशस्त्र पथसंचलन

अक्कलकुव्यातील घटनेच्या धर्तीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अक्कलकुवा शहरात सशस्त्र पथसंचलन

नंदुरबार/फहिम शेख

दिनांक 10/06/2022 रोजी अक्कलकुवा गावातील राहणारा हरीष पवार नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्अॅप स्टेटसवर एका आक्षेपार्ह मजकुरासह फोटो प्रसारीत केला. त्यामुळे एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्यामुळे काही लोक अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले लोक घरी जात असतांना त्यातील काही समाजकंटकांनी अक्कलकुवा शहरातील काही घरांवर दगडफेक केली तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते.
त्याअनुषंगाने अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे दगडफेक करुन दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करुन आजतागायत 28 आरोपीतांना अटक करण्यात आली असून अक्कलकुवा शहरात सद्या शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तरी देखील नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अक्कलकुवा शहरातील नागरिकांच्या मनातील भिती नाहिशी व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 12/06/2022 रोजी अक्कलकुवा शहरात विशेषतः महत्वाचे भागात पोलीसांनी सशस्त्र संचलन केले अक्कलकुवा शहरात पोलीसांनी केलल्या सशस्त्र सचलनाचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले तर त्यांच्या सोबत मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. संभाजी सावंत यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा, तळोदा, मोलगी, विसरवाडी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच राज्य राखीव पोलीस बल (SRPF) धुळे येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते. सकाळी 11 वाजता पोलीसांच्या सशस्त्र संचलनाची सुरुवात अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून तळोदा नाका, आमलीबारी फाटा, संजय नगर, मुख्य बाजार पेठ, झेंडा चौक, हनुमान चौक, परदेशी गल्ली, बस स्थानक व तेथून पुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सशस्त्र संचलन समाप्त करण्यात आले होते आज रोजी संपन्न झालेल्या संचलनामध्ये 14 पोलीस अधिकारी व 103 पोलीस अमंलदार हजर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button