प्रतिनिधी शकील शेख
विवरे बु॥ जि प मुलांमुलींच्या शाळेच्या १६८ विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप
रावेर ( प्रतिनिधी )देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन असल्याने शाळा बंद आहे. त्यामुळे विवरे बु॥ जिल्हा परिषद मराठी मुलां, मुलींची शाळेच्या विद्यार्थ्यांना व त्यांचे पालकांना मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत विदयार्थ्यांचे जेवणाचे हाल होवू नये. म्हणून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन अंतर्गत मिळणारी खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना एक एक करून शाळेत बोलावून तांदुळ व दाळची १६८ (मुलामुलींना ) विदयार्थ्यांना वाटप करण्यात आली. जे पालक आजारी आहे.
त्यांचे घरा पर्यंत जावून तांदुळ,दाळ पोहचविण्यात आले. पालकांनी तांदुळ वाटप करतांना गोंधळ, गर्दी होणार नाही याची काळजी घेवून सोशल डिस्टेंशन ठेवण्यात आले. शासन निर्णया नुसार शाळा व्यवस्थापन समितीने तांदुळ, दाळ वाटप केली.
जि प मराठी शाळेच्या विद्यार्थीनी व विदयार्थ्यांना तांदुळ वाटप करतांना शाळा व्यवस्थापन समितीचे वासुदेव नरवाडे, उपसरपंच रविंद्र वासनकर , बिसन सपकाळे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते, ग्रा.प. सदस्य भागवत महाजन, मुख्याध्यापक सौ मिना कोल्हे , श्रीमती फातमा तडवी, शिक्षक विजय कोल्हे, सौ सुनंदा सावकारे, सौ मिनाक्षी पाटिल, श्रीमती सीमा तळेले, क्लार्क सुरज नरवाडे, राहूल पाटिल, बाळू वाघोदे, शिपाई गुलाब भंगाळे, श्रीकृष्ण हरमकार, यासह पालक , विदयार्थी उपस्थित होते . तालुक्यात विवरे बु॥ शाळेने शासन निर्णयाचा आदर करुन अंमलबजावणी केली. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना तांदुळ मिळाल्याने त्यांचा काही प्रमाणात जेवणाचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.






