Maharashtra

?️ बॉलिवूड सुंदर,बिनधास्त,बुद्धिमान, खेळकर सारा अली खान काय म्हणाली अमृता आणि सैफ बद्दल….

बॉलिवूड

?️ सुंदर,बिनधास्त,बुद्धिमान, खेळकर सारा अली खान काय म्हणाली अमृता आणि सैफ बद्दल….

सध्या सारा अली खान बॉलिवूडच्या नवीन अभिनेत्रींमध्ये टॉपला आहे. साराने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केल.आणि तिची तेव्हापासून तिची लोकप्रियता गगनाला भिडलेली आहे. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने लोक साराला फॉलो करतात.तिचे लाखो प्रेक्षक चाहते आहेत. साराला पाहून असे वाटत नाही की ती एक सुपरस्टार आहे. तिची वागणूक अत्यंत सभ्य आणि साधेपणाची आहे. तिला स्टार असल्याचा गर्व नसून ह्या मुळेच लोक इतर अभिनेत्रींपेक्षा साराला अधिक प्रेम आणि आपुलकी देतात.

नुकत्याच एका मुलाखतीत साराला तिच्या आई आणि वडिलांबद्दल विचारले असता ती म्हणाली की माझे आईवडील विचित्र आहेत, ते त्यांच्या क्षेत्रातल्या इतर लोकांसारखे ते नाहीत. ते लोकांच्या अपेक्षा बद्दल कधीही दबाव किंवा ताण घेत नाहीत. यामुळे, ते मस्त आणि अद्वितीय दिसतात.

मला असे वाटते की माझ्यामध्येही हे गुण आहेत. म्हणजे, आपल्याला ,हृदयाला जे उचित वाटेल ते करा आणि लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. अब्बू आणि आई दोघेही विचार न करता त्यांच मनाचे ऐकतात. माझ्यामध्ये हा समान गुण आहे जो या दोघांकडून आला आहे.

सारा तिच्या आई आणि वडिलांचे परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे. साराचे सौंदर्य आणि मस्त स्वभाव तिची आई अमृतामुळे आहे, तर तिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता वडील सैफच काम आहे.

साराचे दोन चित्रपट लवकरच येणार आहेत. यातला पहिला चित्रपट इम्तियाज अलीचा ‘लव्ह आज तक 2’ आहे. यात ती तिच्या क्रश कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. दुसरा चित्रपट डेव्हिड धवनचा ‘कुली नंबर 1’ आहे. यात वरुण धवन तिच्यासोबत दिसणार आहे. आता साराचे हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय तयार करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button