Maharashtra

शिवसेना प्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन परंडा विविध कार्यकारी सेवा संस्थेने थकबाकीदार शेतकऱ्यांना शिवसेना युवा नेते रणजीत पाटील यांच्या हस्ते कर्जाचे वाटप

शिवसेना प्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन परंडा विविध कार्यकारी सेवा संस्थेने थकबाकीदार शेतकऱ्यांना शिवसेना युवा नेते रणजीत पाटील यांच्या हस्ते कर्जाचे वाटप

परंडा तालुका प्रतिधिनी सुरेश बागडे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन परंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या थकबाकीदार सभासदांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत शिवसेनेचे युवा नेते रणजित दादा पाटील यांच्या हस्ते सोमवार दि २७ रोजी संस्थेच्या कार्यालयात कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुर्तीचे पुजन शिवसेना युवा नेते रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे चेअरमन सौ गंगुबाई राजेश गायकवाड, गोकुळ जगन्नाथ खैरे , अब्दुल पटेल, मुजीब काझी , गट सचिव जनार्धन गवारे , मधुकर गायकवाड , यांचा शेतकरी सभासद . उपस्थीत होते संस्थेचे थकबाकीदार शेतकऱ्यांना ६ लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button