Amalner

अमळनेरात कोरोनावर विजय मिळविताना पोलिसांचे योगदान मोठे

अमळनेरात कोरोनावर विजय मिळविताना पोलिसांचे योगदान मोठे

सॅल्युट करत आ.अनिल पाटलांनी वाढविले पोलिसांचे मनोबल

नूरखान

अमळनेर-शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झालेला असताना तो रोखण्यात पोलिसांचे योगदान व तळमळ मोठी असून आपले कर्तव्य बजावीत असताना त्यांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी अमळनेर पोलिसांना करून त्यांना उत्तम कामगिरीबद्दल सॅल्युट करत मनोबल वाढविले.
येथील पोलीस ग्राऊंडवर आ.अनिल पाटील यांनी सर्व पोलीस कर्मचारी,एसआरपी प्लाटून,सैन्यातील जवान व माजी सैनिकांची भेट घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,सहा पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.सर्व कर्मचारी बांधवाना संबोधित करताना आ पाटील पुढे म्हणाले की कोरोनाचे आकडे अमळनेर येथे वाढल्यानंतर पोलिसांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याने आज कुठेतरी हे आकडे घटताना दिसत आहेत,पोलिसांचे काम प्रामाणिकपणाने सुरू असल्यानेच हे चित्र बदलत आहे,यामुळे सर्वाना माझा सॅल्युट आहे.हे लॉकडाउन संपल्यानंतर सर्वांचे गेट टुगेथेर करून तुमच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे.व्यथा सगळ्यांच्या आहेत पण प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलिसांना मोठे योगदान द्यावे लागत आहे,प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाची काळजी आहे,खरे पाहता सर्वात जास्त संपर्क डॉक्टर मंडळींचा रुग्णांशी येत आहे तरी देखील ते आज सर्वात पुढे आहेत, मात्र ते कर्तव्य बाजविताना चांगल्या प्रकारे स्वतःची काळजी घेत आहेत तशीच काळजी पोलीस बांधवांनी देखील घ्यावी.आपण आता या आजाराची सवयच करून घेतली पाहिजे, आपली दिनचर्या आता बदलवून घेऊन त्या पद्धतीने वागले पाहिजे आकडे कमी होत असल्यामुळे सर्वांचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी मी खास या ठिकाणी आलो आहे .या आजाराने कोणीही हतबल होऊ नका, सर्वांनी मिळून काळजी घ्या पोलिस बांधवांना कोणताही त्रास झाला तर त्यांनी दुर्लक्ष न करता लागलीच येथील तज्ञ डॉ अविनाश जोशी यांना दाखवावे ते सर्वांवर मोफत उपचार करतील असेही आमदारांनी यावेळी जाहीर केले.
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की पोलिसांनी आपली मानसिकता चांगली ठेवली पाहिजे,आरोग्यासाठी आयुश काढा सर्वांनी घ्यावा, व्हिटामीन सी च्या गोळ्याही सर्वांनी घ्याव्यात, प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आपले हात कुठेही लावू नका, कोणाच्या जवळ जाऊ नका, आपला मास्क मुळीच काढू नका, असा सल्ला देत सर्व पोलिसांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

दरम्यान कोरोना युद्धात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकांची काळजी व भेट आ पाटील घेत असल्याने खरोखरच त्यांचे मनोबल वाढत असून यामुळे सर्व यंत्रणा जोमाने काम करताना दिसत आहे,याशिवाय आमदार देखील प्रत्येक ठिकाणी क्रियाशीलता दाखवीत असल्याने याचाच सकारात्मक परिणाम जनतेसमोर येत असल्याची भावना अमळनेर वर्तुळात उमटत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button