sawada

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाअधिकारी यांना सावद्याचे मा.नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे निवेदन

लाँकडाऊचा फायदा उचलत ठेकेदाराकडून सावदा थोरगव्हाण रस्त्याचे निकृष्ट काम

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाअधिकारी यांना सावद्याचे मा.नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे निवेदन

सावदा प्रतिनिधी यूसुफ शाह

सावदा ते थोरगाव्हण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून माती मिश्रित खडी मध्ये या रस्त्याचे काम केले जात आहे तसेच सावदा व थोरगाव्हण शिवारातील या रस्त्यालगत असलेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्याच्या बांधाची लागून संबंधित ठेकेदाराकडून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गटारी खोदण्याचे काम चालू असून त्या गटारी खोदत असताना अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे तसेच आता समोर पावसाळ्याचे दिवस असून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देखील संबंधित ठेकेदाराने ठेवलेला नाही याआधीच कोरोना विषाणू मुळे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले असून आता सावदा थोरगाव्हण शिवारातील शेतकर्वरती हे सुलतानी संकट आले असून या संकटाची प्रशासनाने तातडीने दखल समंधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व उपाययोजना कराव्या जेणेकरून खरीप हंगामात शेतकऱ्याला शेती करायला सोयीचे व सुलभ जाईल व समंधीत ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन सावदा शहराचे मा.नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी जिल्हा अधिकारी व समंधीत दिले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार असून संबंधित विभागा बाबतीत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील अनभिज्ञ आहेत
– राजेश वानखेडे
मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगसेवक
न.पा.सावदा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button