Paranda

परंडा पोलिसांची मोठी कारवाई ९ लाख ६९ हजार गांजा जप्त पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा पोलिसांची मोठी कारवाई ९ लाख ६९ हजार गांजा जप्त पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : सुरेश बागडे परंडा

परंडा : परांडा व भूम पोलिसांच्या पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी भूम तालुक्यातील वांगी येथे धाड मारून ६४ किलो गांजा जप्त करून पाच आरोपी विरुद्ध परंडा पोलीसात दिनांक 13 रोजी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी फरार झाले आहे .
पोलिसांच्या धडक कारवाईने गांजा तस्करांच्या तंबुत खळबळ उडाली आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशीकी या गांजा तस्कर आरोपीवर भुम पोलिसात या पुर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते या आरोपीच्या शोधासाठी परंडा चे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे पोलीस उपनिरीक्षक ससाणे पो उप निरिक्षक मोमीन , पोलीस नाईक खोसे ,महिला पोलीस नाईक मुल्ला, पो ना शेंदारकर , पो .कॉ रामराजे शिंदे ,पोलीस नाईक कळसाईन पोलीस नाईक काटवटे ,पोलीस कॉस्टेबल पालखे पो.कॉ पवार तसेच भुम चे पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने दिनांक 12 नोव्हेंबर रोजी भूम तालुक्यातील वांगी येथे दुपारी धाड मारली असता आरोपीच्या घरासमोर उभी असलेली
इनोवाकार क्रमांक MH 25 1777 मध्ये १० कीलो तर पिकप क्रमांक एम एच 25 D- 1225 मध्ये सहा किलो तर आरोपीच्या घरांमध्ये 48 किलो गांजा सापडला आहे
पोलिसांनी पंचनामा करून ६४ की लो गांजा व दोन वाहने असा एकुन २२ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला व तिन आरोपींना अटक केली तर दोन आरोपी पसार झाले .

गांजा तस्कर प्रकरणी अण्णा रामदास पवार ,अमोल सुभाष पवार ,सुभाष आण्णा पवार, रामदास अण्णा पवार, राहणार वांगी खुर्द तालुका भूम तर नागेंद्र बाबू जेमोली रा . आंध्रप्रदेश यांच्याविरुद्ध परंडा पोलीसात कलम 20 ( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास परंडा चे पोलीस निरीक्षक गिड्डे हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button