फैजपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांची वृत्तपत्र आणि पत्रकारांशी भेदभाव…
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर येथील गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेचा कारभार सांभाळणारे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी येथील स्थानिक वृत्तपत्र आणि स्थानिक पत्रकारांशी भेदभाव सुरू केला असून गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेच्या कार्यभार सांभाळणारे चव्हाणसाहेब हे केवळ मोजक्याच वृत्तपत्रांना व पत्रकारांना वृत्तपत्र आणि नाव पाहून जाहिराती देतात परंतु फैजपूर शहरात काम करणारे पत्रकार आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्र याबाबत स्थानिक पत्रकारांनी गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेत वेळोवेळी लेखी अर्ज करून म्हटले आहे की आपण रोस्टर पध्दतीनुसार जाहिराती द्याव्यात परंतु नगरपरिषदेत याचा वेगळाच अनुभव तीन वर्षांपासून वृत्तपत्र आणि पत्रकारांना येत आहे जिल्हास्तरावर जवळजवळ पंधरा वृत्तपत्र असून त्याचप्रमाणे काम करणारे शहरात पत्रकार सुद्धा पंधरा आहे परंतु नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांना या संबंधित सर्व माहिती असूनसुद्धा लेखी अर्ज करूनसुद्धा मनमानी कारभार सुरू आहे त्यामुळे जिल्हास्तरीय वृत्तपत्रांमध्ये आणि स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जिल्ह्यात स्थानिक वृत्तपत्र पंधरा सोळा असून केवळ ५ ते ६ वृत्तपत्रांना जाणीवपूर्वक आणि भेदभाव करून जाहिराती दिल्या जात असून उरलेले ६ ते ७ वृत्तपत्र आणि पत्रकार आहे या पत्रकारांना मात्र जाहिरातीसाठी नगरपरिषदेत चकरा मारूनही भेदभाव करून जाहिरात निघाली की तुम्हाला कळवू असे सांगण्यात येते याबाबत फैजपुरातील वृत्तपत्र आणि पत्रकारांवरील होणारा भेदभाव जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन त्वरित थांबवावा आणि रोस्टरप्रमाणे जाहिराती द्याव्या अशी मागणी आहे






