Amalner: शिवसेनेतर्फे गणेशोत्सव निमित्त आरास आणि आकर्षक गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन..सहभागाचे आवाहन..!
अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेतर्फे तालुक्यातील गणेशोत्सवानिमित्ताने आरस आणि
आकर्षक गणेशमूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेने तर्फे करण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख,सिध्दी विनायक मंदिराचे खजिनदार संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि तालुक्यातील विविध गणेश मंडळाच्या माध्यमातून अतिसुंदर
आरास व आकर्षक गणेश मूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख मोहन भोई, शहर संघटक चंद्रशेखर भावसार आणि मा.ता. संघटक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.
यासाठी तालुका प्रमुख विजू मास्तर, माजी उपजिल्हा प्रमुख सुभाष भांडारकर, नरेंद्रसिंह ठाकोर, देवेंद्र देशमुख, नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनिषाताई परब, महिला आघाडीच्या संगीताताई शिंदे, शहर प्र. उज्वलाताई कदम, प्रताप शिंपी, नितीन निळे, दादा पवार, माजी तालुका प्रमुख किसन पाटील, वैद्यकीय सेना प्र. प्रमोद शिंपी, उपशहरप्रमुख जीवन पवार, शिक्षक सेनेचे बोरसे उमेश अंधारे, अनंता निकम, एसटी कामगार सेनेचे किरण सोनवणे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील उप तालुका प्रमुख विलास पवार, गजानन भामरे, विश्वास महाराज सोनवने, ज्ञानेश्वर पाटील बाबू पर, बाळासाहेब पाटील (खर्दे), दिलीम पाटील (आमोदा), मनीष, भगवान सुतार (दहीवद) सुभाष पाटील (म्हसले), नितीन पाटील (ढेकू),राजेन्द्र मराठे (नांदरी) तसेच शिवसेना संलग्न इतर संघटना,शिवसेना शाखा प्रमुख,विभाग प्रमुखांचे सहकार्य लाभणार आहे.






