Usmanabad

वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्काळ प्रस्ताव द्या – ना अमित देशमुख

वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्काळ प्रस्ताव द्या – ना अमित देशमुख

उस्मानाबाद मध्ये आढावा बैठक

उस्मानाबाद प्रतिनिधी:- प्रशांत नेटके

उस्मानाबाद:- येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता शासन स्तरावर गती मिळाली असून या अनुषंगाने विविध विभागासाठी लागणाऱ्या जागेसह इमारत, वाचनालय, क्रीडांगण, वसतिगृह यासाठी आवश्यक ते प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश आयुष विभागाच्या संचालकांना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भात ना.देशमुख यांनी गुरुवारी(दिनांक २०)रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीला उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश खापर्डे, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, आ कैलास पाटील, आ राणाजगजितसिंह पाटील,माजी आ.मधुकरराव चव्हाण ,माजी आ.वैजनाथ शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपकुमार शेंगुलवार,सहाय्यक अधिष्ठाता डॉ. एस.एल.गुप्ता, डॉ .कादरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे, आदीसह रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.देशमुख म्हणाले, पदव्युत्तर विध्यार्थ्यांसाठी इमारत, वाचन कक्ष, औषधी वनस्पती लागवड करण्यासाठी जागा, मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी पाच एकर जागा ,क्रीडांगणासाठी पाच एकर जागा,ग्रंथालय व वाचन कक्षासाठी इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी आयुष मंत्रालयाच्या संचालकांना दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button