Amalner

?️अमळनेर कट्टा.. अखेर साहेबरावच मदतीला धावले… खाशि(खादाड शिक्षण) आणि प्रशासनाने केलेल्या अन्यायावर घातली फुंकर..

?️अमळनेर कट्टा.. अखेर साहेबरावच मदतीला धावले… खाशि(खादाड शिक्षण) आणि प्रशासनाने केलेल्या अन्यायावर घातली फुंकर..रोजंदारी कर्मचारी कॊव्हिड सेंटर प्रताप महाविद्यालय आमचे कॊव्हिड सेंटर येथे काम कर करण्याचॆ मानधन बद्दल प्रसाद मुरलीधर चौधरी, प्रवीण बालकृष्ण डम्बेलकर याकर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांचे कार्यालय समोर उपोषण केले.कोव्हिड 19 च्या काळात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोनाचा कहर होता. यावेळी हॉटस्पॉट अमळनेर ठरले होते. कोरोना काळात रुग्णांचे नातेवाईक देखील त्यांच्या सोबत राहत नव्हते. अश्या अत्यन्त वाईट काळात रुग्णांना साथ होती ती म्हणजे त्या कोरोना योद्धयांची साथ होती.प्रशासकीय व पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी व त्या कोविड सेंटर मधील सफाई कामगार व देखभाल करणारे कामगार हे होते. अश्याच कामगारांमधील कोव्हिड सेंटर मध्ये देखभाल करणारे 2 कामगार होते ते म्हणजे प्रसाद आणि प्रवीण हे होत…कोव्हिड केअर सेंटर मधील पंखे, लाईट, नळ तसेच इतर वस्तू सुधरवणे हे त्यांचे काम होते….
शासनाने कोरोना रुग्णांसाठी प्रताप महाविद्यालय अधिग्रहित केले.या दोन्ही कामगारांना देखील तेथेच सेवा देण्यास सांगितले…. मात्र त्यांच्या पगाराच्या वेळेस महसूल प्रशासनाने नगर परिषदकडे, नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे.अशी टोलवाटोलव सुरू झाली. त्यामुळे कामगारांनी त्या वेळेस काही दिवस काम बंद केले…. व तेव्हा कृषिभूषण पाटील यांनी त्यांना 5 हजाराची मदत केली तर पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील 15 हजार मिळवून दिले. परिणामी कामगारांनी पुढे काम सुरु केले.पुन्हा उर्वरित पगारासाठी सदर कामगारांनी पत्र व्यवहार केले परंतु त्यांना न्याय मिळाला नाही परिणामी आज 26 जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. जेणे करून प्रशासनाला जाग येईल. आज 26 जानेवारी रोजी जेव्हा ते कामगार उपोषणाच्या वेळी हा विषय कृषिभूषण पाटील यांना माहीत झाल्यानंतर तेथे अधिकाऱ्यांसह भेट घेतली व समस्या जाणून घेतल्यानंतर स्वतः पुढाकार घेई कृषिभूषण पाटील यांनी कामगारांना 20 हजार रुपये देऊन उपोषण संपविले….मा. आमदार दादासाहेब साहेबरावजी पाटिल यांनी स्वतः जवळील रुपये २०,०००/- मानधन देऊन आमचे उपोषण सोडविले त्यावेळी मा. तहसिलदार सो, मा. पोलिस निरीक्षक सो, पाडळसे धरण संघर्ष प्रणेते मा. अण्णासो सुभाषजी चौधरी,मा. उपमुख्य अधिकारी गायकवाड साहेब, मा. नगरसेवक मनोजबापू, मा. Ad. पाटिल साहेब, सामाजिक कार्यकर्ते मा. प्रवीण संदांनशिव, मा. देविदास देसले, मा. ज्ञानेश्वर चौधरी व पत्रकार मित्र उपसथीत होते.आमचे मानधन मिळाल्यामुळे २६ जानॆवारी २०२१ चे उपोषण माघे घेतले आहे अशी प्रतिक्रिया उपोषण कर्त्यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button