Amalner

?️अमळनेर कट्टा…Breaking…अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की..जीवे मारण्याचा प्रयत्न..!..वाळू माफियांवर 307 आणि 353 दाखल…!

?️अमळनेर कट्टा…Breaking…अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की..जीवे मारण्याचा प्रयत्न..!..वाळू माफियांवर 307 आणि 353 दाखल…!
अमळनेर येथे गंगापुरी शिवारात अवैध वाळू उपसा करण्याऱ्या वाळू माफियांना पकडण्या साठी गेलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना धक्का बुक्की करून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अमळनेर पोलीस ठाण्यात307,353 व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की अवैध गौण खणिज चोरी विरोधात कारवाई करीत असताना रेती माफिया गौण खनिज चोरी करण्यासाठी महसुल व पोलीस प्रशासनाची छापा कार्यवाही यशस्वी होवू नये याकरिता अधिका-याच्या घराजवळ व त्यांचे वाहनावर निगराणी करण्यासाठी तसेच चोरीच्या मार्गावर ठिकठिकाणी चौकात व रस्त्यावर पाळत ठेवण्यासाठी वाचर ठेवत असतात तसेच शासकिय
पथकाने वाहन अडविल्यानंतर त्यांच्यावर बळाचा वापर करून वाहन पळवून नेणे प्रसंगी अशा शासकिय कर्मचा-यास जीवे ठार मारणे या प्रकारची संघटीत गुन्हे करण्याची पद्धती अवलंबीत असतात.
अमळनेर तालुक्यातील गंगापुरी भागातील तापी नदीत वाहनाने तहसिल कार्यालाय अमळनेर येथुन निघून जळोद गारील चमन अधिकारी व कर्मचारी असे शासकिय वाहने तसेच काही कर्मचारी खाजगी त्यानंतर गावाचे बाहेर वाहने लपवून आमचे पथक प्रमुख यांनी दोन पथक तयार केले.माझे पथकात तिलेश अशोक पवार, संदिप शिंदे, सचिन बमनाथ, सतिश शिंदे, हर्षवर्धन मोरे असे व दुसरे पथकात ईतर सर्व होते. त्या पैकी आमचे पथक गंगापूरी शिवारातील तापी नदीच्या पात्रात उतरले व मा. तहसिलदार सो. याचे सोबत चे पथक तापी नदीच्या जळोद पुलावर दोन्ही बाजुस लपून बसले आम्ही तापी नदी पात्रात पोहचल्यावर दिनांक 22/5/2021 रोजीचे रात्री 12.30 वा.आम्हाला त्या ठिकाणी 6 ट्रक्टर वाळु भरताना दिसले त्यातील तिन एका ठिकाणी व ईतर तिन थोड्या अंतरावर असल्याने आम्ही पुन्हा आमचे
पथकाचे दोन भागात विभाजन केले माझे सोबत तिलेश पवार, सतिष शिंदे असे होते. आम्ही वाळु भरत असलेल्या तिनही ट्रॅक्टर चे जवळ जावुन त्यानां महसुल विभागाचे पथकात असुन मा.उपविभागीय अधिकारी याचे आदेशाने येथे आलो आहोत असे सागीतले त्या नंतर समोर उभे असलेल्या एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रक्टर क्र.एम एच 19 सिजे 1533 वरील चालकास त्याचे नाव गाय विचारले असता
त्याने त्याचे नाव जगन पावरा रा. दुधगाव व ट्रक्टर मालकाचे नाव महेश ज्ञानेश्वर पवार व अतुल ज्ञानेश्वर पवार रा.अनवर्दे ता. चोपडा असे
सांगितले तसेच माझे सोबतचे सहकारीनी इतर दोन्ही वाहन चालकाना त्याचे व त्याचे मालकाचे नाव गाव विचारले असता त्यानी स्वताचे नाव न
सागंता वरील दोन्ही ट्रक्टरचे मालक धिरज प्रभाकर धनगर रा. बुधगाव ता. चोपडा हे आहेत असे सागीतले त्या नंतर आम्ही वरिल तिनही ट्रक्टर चालकानां वाहने तहसिल कार्यालय अमळनेर येथे घेणेस सांगीतले त्या साठी आम्ही तिघेही जण प्रत्येकी एक ट्रक्टर वर बसलो तेव्हा तेथे वरिल ट्रक्टरचे मालक महेश पवार , अतुल पवार, धिरज धनगर हे आले त्यानी आम्हाला नदित कोणीच अडवण्याची हिम्मत करत नाहीत
तसेच ज्याने अडविले त्याला आम्ही जिंवत सोडत नाहीत असे म्हणुन ट्रक्टर वरुन खाली आौढण्याचा प्रयत्न केला मी ज्या ट्रक्टर वर बसलो होतो तेथे महेश व अतुल हे आले व तु खाली उतर नाहीतर तुला चाकाखाली घेतो असे धमकी देवु लागले तसेच चालकास ट्रैक्टर चालु ढकलले तसेच याचावरुन टायर घे असे चालकास सागीतले त्या प्रमाणे चालकाने सुध्दा दोन वेळेस ट्राली मागे पुढे करत मला चाकाखाली दाबुन
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस अतुल इतर दोन्ही चालक व त्याचे मालक धिरज धनगर यानां ओरडून सागंत होता कि, तुम्हाला थांबविणारे तहसिलच्या लोकानां चाकाखाली दाबा असे चिथावणी देत मला तसेच माझे सहकारीना मारहान करत वरिल तिनही ट्रक्टर प्रत्येकी 1 ब्रास वाळु अशी 11,550 रुपये किमंतची चोरी करुन घेवुन ते पळुन गेले आम्ही सदरची हकिगत आमचे वरिष्ठानां कळविली इतर तिन ट्रक्टर वर कारवाई करत वरील पळवुन घेवुन गेलेले तिनही ट्रक्टर चे चालक व मालक याचे बाबत तक्रार देणे साठी पोलीस स्टेशनला आलो आहे.
12.30 ते .30 वाजेच्या दरम्यान गंगापूरी शिवारातील तापी नदीच्या पात्रातुन 1)महिंद्रा कंपनीचे ट्रक्टर क्र.एम एच 19 सिजे .
19 सिजे 1533एक ब्रास रेती भरलेले याच्यावरील चालक जगन पावरा रा. बुधगाव ता. चोपडा
2) ट्रक्टर मालक – महेश ज्ञानेश्वर पवार रा. अनवर्दे ता. चोपड़ा
3)अतुल ज्ञानेश्वर पवार रा.अनवर्दे ता. चोपडा 42 धिरज प्रभाकर धनगर रा.बुधगाव ता. चोपडा व त्याचे दोन चालक नाव गाव माहीती नाही अशानी संगन मत करुन संघटीत गुन्हेगारी करत अवैध रित्या गौण खनिज चोरी करून नेत असता.
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण करुन करत असलेले शासकिय कामात अडथळा करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन
तिनही ट्रक्टर मधील प्रत्येकी 1 ब्रास वाळु अशी 11,550 रुपये किमंतची 3 ब्रास चोरी करुन घेवुन ते पळुन गेले आहे म्हणुन 6 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता 307,353,379,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी नरसिंह वाघ हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button