Jalgaon

? जळगांव Live..30 एप्रिल पर्यंत विशेष निर्बंधां सह नवीन नियमावली जाहीर..!जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश..!

? जळगांव Live..30 एप्रिल पर्यंत विशेष निर्बंधां सह नवीन नियमावली जाहीर..!जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश..!

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च,
2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या कार्यालयाचे आदेश दिनांक 30 मार्च, 2021 नुसार संपूर्ण जळगांव जिल्हयासाठी विशेष निर्बन्ध लागू करण्यात आलेले असून शासन आदेश दिनांक 04 एप्रिल, 2021 अन्वये जळगांव जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदी लागू करण्यात आलेल्या असून दिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो विशेष निबंध लागू करण्यात आलेले आहेत.

जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथरोग अधिनियम, 1897 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये शासन आदेश दिनांक 04
एप्रिल, 2021 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार या कार्यालयाचे दिनांक 30 मार्च, 2021 रोजीचे आदेश अधिक्रमीत करण्यात येत असून संपूर्ण जळगांव जिल्हयाकरीता दिनांक 05 एप्रिल, 2021 रोजी रात्री 08.00 वाजेपासून ते दिनांक
30 एप्रिल, 2021 रोजी रात्री 11.59 वाजे पावेतो खालील प्रमाणे सुधारीत आदेश पारीत करीत आहे.

1) संचारबंदी व Night Curfew :- (फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये)
a) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो संपूर्ण जळगांव जिल्हयात फौजदारी प्रक्रिया
संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.

b) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपावेतो संपूर्ण जळगांव जिल्हयात 05 पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई राहील.

c) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो शुक्रवार रात्री 08.00 वाजेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.

d) वरील लागू करण्यात आलेल्या निबंधातून मेडीकल व इतर अष
पत्याय यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक देणारे घटक यांना सुट राहील. तथापि संबंधितांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

e) वरील प्रमाणे निबंधातून खालील प्रमाणे अत्यावश्यक सेवा..

1) हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक
ii) किराणा दुकाने, भाज्यांची दान एका (सर्व आठवडे बाजार बंद
राहतील)
iii) रेल्वे, टॅक्सी, विमान द्वारे प्रवाशांना रात्री 08.00 ते सकाळी 07.00
दून परत येण्यास परवानगी असेल. तथापि संबंधित
iv) रेल्वे / बस / हिमान यांचे वध असलेले तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रूपक सेवा
vi) माल वाहतूक
vii) कृषी संबंधित सेवा
viii) ई कॉमर्स
ix) मान्यताप्राप्त मिडीया
x) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणा-या अत्यावश्यक सेवा
xi) पेट्रोलपंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन
xii) सर्व कार्गो सेवा
xiii) डाटा सेंटर्स / क्लाऊड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा
xiv) शासकीय /खाजगी सुरक्षा सेवा
xv) फळ विक्रेते
xvi) गॅरेज

2) बाह्य उपक्रम :

a) सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक मैदाने हे रात्री 08.00 ते सकाळी 07.00 पावेतो
बंद शुक्रवारी रात्री 08.00 ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील.
b) सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपावेतो सार्वजनिक जागेवर वावरतांना सर्व
नागरिकांनी जमावबंदी व कोविड-19 निर्देशांचे पालन करावे.
c) सार्वजनिक जागांचे ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी निरीक्षण करावे व कोविड निर्देशांचे उल्लंघन होत नसल्यास ते बंद करावेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button