कळवण तालुक्यातील मोहनदरी शिवारात पाझर तलावाजवळ दारू अड्डा उध्वस्त
सुनिल घुमरे
नाशिक सध्या जगभरासह महाराष्ट्रात असलेल्या कोरोना रोगाच्या असलेल्या प्रादुर्भावानुसार महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी शासनाने लोक डाउन केलेला मात्र तरीही दुर्गम भागात काही लोक दारू बनवून विकण्याचे काम सुरू असल्याने असताना नाशिक माननीय अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार नासिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,कळवण विभाग जि.नाशिक यांनी कारवाई केली असून कळवण तालुक्यातील मोहनदरी शिवारात पाझर तलावाजवळ दारू गाळून विकण्याचे काम चालू असल्याचे निरीक्षक सोनवणे साहेब सहा दुय्यम निरीक्षक गरूड साहेब तसेच पाटील सो वाईकर सो शेवगे सो यांच्या टिमने दिनांक 12/ 04 /2020 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून दारू गाळण्याचा व दारू बनवण्याचा अड्डा उध्वस्त केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र भर व केंद्रानेही लॉकडाऊन सुरू केला असुन नासिक जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग अवैध मद्यपान विक्री करणाऱ्या वर कारवाई करत असुन प्रत्येकपोलीस स्टेशन चे हद्दीत ही पोलीसांनी अवैध धंदे करणारे सापडले तर कारवाई केली आहे मात्र अशाही परिस्थितीत ग्रामीन व अदिवासी दुर्गम भागातील काही लोक या व्यवसायात असुन नाले नदी पाझर तलाव किंवा सुनाट परीसरात आपले काम छुप्या मार्गाने करत आहे भ मात्र दारू पिणारे च कुठूनही दारु अड्डे शोधून कुठे मिळते याची कल्पना इतरांना देताथ व तोच खरा हे अवैध धंदे कोठे आहेत ह्यामुळे उघड होते तेव्हा अशा प्रकारे व्यवसाय करू नये असे वारंवार प्रशासन ने सांगुन व लॉकडाऊन चे काळात घरात च रहा हे सरकारचे आवाहन असुन ही बोगस प्रकार रे धंदे करणार असतील तर गय होणार नाही असे संबिधातिंनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.






