Amalner

Amalnee: पिंपळकोठे येथे शेतकरी कुटुंबाचे घर गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी…आपच्या पदाधिकार्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी…

Amalnee: पिंपळकोठे येथे शेतकरी कुटुंबाचे घर गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी… आपच्या पदाधिकार्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी…

अमळनेर:-10/06/23 रोजी. सायंकाळी अचानक वादळ वारा आल्याने पिंपळकोठे शिवारातील रस्त्यालगत असलेल्या, एक गरीब शेतकरी कुटुंबाचं, संपूर्ण गोठा घर होत्याचं नव्हतं झालं, एम, एस, सी, बी, विद्युत पुरवठा रस्त्यालगत जातांना तारांचा स्पर्श होऊन, तारांमधून जो गुलाला तुटला, आणि क्षणातच उन्हाने तापलेला गुराढोरांसाठी साठवून ठेवलेला चाराच होत्याचं नव्हतं झालं, आणि बनवलेले गोठा शेड देखील भस्म झाली.आज रोजी आपल्या गरीब शेतकरी कुटुंबावर आपबीती ही आपल्या सर्वांच्या समोरच संतोष पाटील तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी अमळनेर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवित आहे. आपल्या विधानसभा क्षेत्र अमळनेर तालुका, तसेच जिल्हा परिषद गट पारोळा येथील.आपल्या पिंपळकोठा गावातील नारायण भाऊराव पाटील, यांच्या पिंपळकोठे बोलाणे, जिराळि, मेन रोड रस्त्यावर गोठा शेड व आपल्या शेतातील उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी आपल्या हाताने आपल्याच शेतातील बनवलेले गोठा शेड, व आपल्या गुरढोरासहित तसेच आपण आपल्या परिवारास शेतकरी प्रमाणे नेहमीच्या उद्योग व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य, आणि गुराडोरांसाठी दोन ते तीन ट्रक चारा आपली शेतीचे अवजारे तसेच, नेहमी लागणार साहित्य व संपूर्ण आपलं शेतीसाठी लागणारे अत्यावश्यक बी बियाणे येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला लागणारे सर्व साहित्य जळून राख रांगोळी झालेली आहे तरी कृपया आपण यांना आपल्या शासनाच्या आपत्ती व्यवस्थापना मार्फत, रितसर चौकशी करून पंचनामा करावा आणि नुकसान झालेल्या ग्रस्त कुटुंबांना योग्य ती भरपाई मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button