Nashik

पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड गुरुमाऊलींनी घातली— मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री समर्थ मार्गप्रणित कृषी महोत्सवाचा समारोप

पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड गुरुमाऊलींनी घातली— मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्री समर्थ मार्गप्रणित कृषी महोत्सवाचा समारोप

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

नाशिक :गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकमध्ये पाच दिवसांपासून सुरु असलेल्या श्री समर्थ मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.

डोंगरे वस्तीगृहावर पाच दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी तेथील स्टॉल धारकांशी हितगुज साधले. कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प. पू. अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत दादा मोरे, आबासाहेब मोरे,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आ. बबन लोणीकर, आ. संजय शिरसाठ, आ. भरत गोगावले, आ. सुहास कांदे, आ. सीमा हिरे, खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविक शेतकºयांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, हे राज्य केवळ जनतेचे असून त्यांच्या भल्यासाठीच आम्ही राज्यकारभार करीत आहोत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, दिंडोरी प्रणित श्री समर्थ मार्गाने अनेक शेतकºयांना आपल्या माध्यमातून मार्गदर्शन, मदत केली आहे. समाजाप्रति असलेली बांधिलकी समर्थ मार्गाने सांभाळली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकºयांच्या हाती अधिक पैसा येईल. यादृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल. हवामान बदल, दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने एनडीआरएफची शिफारस डावलून अधिक मदत केली आहे. नियमित कर्ज फेडणाºया ६ लाख ९० हजार शेतकºयांना मदत केली आहे. शेतकºयांसह राज्यातील जनता सुखी व्हावी, यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. हे सरकार केवळ सत्तेवर बसलेल्या एका राजकीय पक्षाचे नाही तर राज्यातील प्रत्येक जनतेचे आहे. शेतकरी व जनतेला पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी सरकारचा नेहमीच प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.मुख्यमंत्री ना शिंदे यांनी गुरुमाऊली शेतकरी व समाज, राष्ट्रासाठी करत असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले,सेंद्रिय शेतीचा नुसता मंत्र देऊन गुरुमाऊली थांबले नाहीत तर अडीच लाख शेतकरी या माध्यमातून जोडून त्यांना अधिक उत्पन्नाचा मंत्र दिला. साडेचारशे महिला बचतगट स्थापन करून हजारो भगिनींना तर हजारो युवकांना रोजगार दिला.1लाख विवाह नोंदणी करून शेकडो युवकांचे विवाह सामुदायिक सोहळ्यात संपन्न झाले.

माजी मंत्री व आ. बबन लोणीकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, स्वामी समर्थ मार्गाने शेतकºयांना अनेक मार्गाने मदत केली आहे. जनतेला लागणाºया शैक्षणिक, आरोग्य आदी सुविधा नाममात्र दरात स्वामी समर्थ मार्ग देत आला आहे. शेतकºयांना केंद्रबिंदू मानून सुरु झालेला हा कृषी महोत्सव शेतकºयांना मार्गदर्शक ठरला आहे. प. पू. अण्णासाहेब मोरे यांनीही उपस्थित भाविकांशी हितगुज केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button