Amalner

गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!” भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा

गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!” भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा

अमळनेर

“गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!” असे प्रतिपादन भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा यांनी अनोरे येथिल आयोजित ग्रामसभेच्या कार्यक्रमात केले.यंदाच्या राष्ट्रीय जल पुरस्कार साठी संपुर्ण महाराष्टातुन आपले जळगाव जिल्ह्यातून अमळनेर तालुक्यातील अनोरे ह्या गावाची सेमीफाईनल फेरीत निवङ झाली आहे यावेळी केंद्रीय भुजल मंत्रालयाच्या जलशक्ती अभियानाच्या वैज्ञानिक श्रीमती अधिरा यांच्या पथकाने गावाची पाहणी केली.
महाराष्ट्रातून केवळ दोनच गावची निवड केंद्रीय पातळीवरील जलशक्ती पुरस्कार स्पर्धेत झालेली आहे त्यात अमळनेर तालुक्यातील अनोरे आणि वाशिम जिल्ह्यातील बोरवा बु!! हे गांव ही आहे. ह्या वेळी खास ग्रामसभा व स्वागत कार्यक्रम संपन्न झाला. मा साहेबराव महाराज व भजनी मंङळ यांनी भजनातुन तर आलेल्या समीतीचे बैलगाङीवर मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागत केले व सौभाग्यवतींनी औक्षण केले तर गावातील विद्यार्थ्यांनी यावेळी स्वागत गित सादर केले.याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर,स्व.नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रमुख संजय पवार यांनी जलसमृद्धीतून ग्राम समृद्धी कडे अनोरेची होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे असे सांगितले.

गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!&Quot; भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा

कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी आधिकारी संभाजी ठाकुर साहेब, तालुका कुषी आधिकारी वारे,यांनी अनोरे गावासाठी कृषी विभागातुन सर्व सहकार्य नेहमीच असेल असे आप आपल्या मार्गदर्शनातून सांगीतले.यावेळी गावातील जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील,जलशक्ती जळगाव चे आकाशसर, ग्रामसेवक शशिकांत पाटील,तलाठी आप्पा कुळकर्णी सा,कृषी सहाय्यक श्री लांङगे साहेब ,दत्ताभाऊ पेंटर सायगव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते.

गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!&Quot; भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा

जलमित्र संदीप पाटील जवखेङा,यांनी गावाने केलेली कामे व लेखाजोखा विस्तृत स्वरूपात आपल्या प्रास्ताविक भाषणात मांङली तर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी ‘अनोरे गावात जनशक्ती व जलशक्ती चा अपूर्व संगम झाला असल्याचे सांगितले.तर श्री बाजीराव पाटील यांनी पांझरानदी जोङ प्रकल्पासाठी श्रीमती अधिरा यांनी केंद्रीय जल मंत्रालय दिल्ली येथुन सहकार्य करावे या मागणीचे लेखी निवेदन ही दिले.तुकाराम पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व असेच काम आगामी काळात अनोरे गाव सातत्य ठेवेल असे सांगितले.
अनोरे गावाने मागीलवर्षी पाणी फाॅन्ङेशन स्पर्धेच्या माध्यमातुन मनसंधारणातुन जल संधारण व मृदसंधारण करत घरातील सांङपाणी तसेच पावसाचे शेतशिवाराचे व छतावरील पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीफान्ङेशनचे राज्याचे तिसरे क्रमांकाचे बक्षीस उत्तरमहाराष्टाला मिळवुन दिले. त्या केलेल्या कामाच्या माध्यमातुन राष्टीय पुरस्काराषाठी प्रस्ताव सादर केला होता.

गावकऱ्यांनी थेंब थेंब जिरवून निर्माण केलेली जलशक्ती हिच खरी समृद्धी आहे!&Quot; भूजल वैज्ञानिक श्रीमती अधिरा

आज गावात झालेल्या कामाची पहाणी करण्यासाठी खास केंद्रीय भूजल मंत्रालयाचे जलशक्ती अभियानाचे पथक आज अनोरे गाव व परिसरातील झालेल्या कामाची शेतात व गावात प्रत्यक्ष पाहाणी केली.सदर पुरस्काराच्या प्रस्तावासाठी मा खंङागरे सर व खुशाल पाटील यांनी अतोनात परिश्रम घेतले. तर कार्यक्रम यशस्वीते साठी संपुर्ण ग्रामस्थ महिला भगीणी तरूण व बालगोपाल यांनी परिश्रम घेतले.
अनोरे येथे मार्गदर्शन करतांना केंद्रीय भूजल मंत्रालयाच्या भूवैज्ञानिक श्रीमती अधिरा,मंचावर उप विभागीय कृषी अधिकारी जाधवर,संजय पवार,संदिप पाटील,तुकाराम पाटील,रणजित शिंदे,बाजीराव पाटील आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button