केंद्र शासनाच्या मोफत धाण्याचे वाटप सुरु
मोफत धान्यापासुन शेतकरी वंचित राहणार का ?
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
लॉक डाऊन सुरू असल्यामुळे केंद्र शासनाने देशात रास्त भाव दुकानातुन मोफत धान्य देण्याचे जाहीर करत अंत्योदय व अन्नसुरक्षा शिधापत्रीकेच्या धान्याचा पुरवठा करून वाटप सुरू केले मात्र सध्या यामध्ये शेतकरी शिधापत्रीकेचा धान्य पुरवठा झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोफत धान्याचा लाभ होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमधे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोवीड-१९ च्या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहून केंद्र शासनाने देशात लॉक डाऊन सुरू केले. या पार्श्वभुमीवर गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून पुढील तीन महीन्यासाठी मोफत धान्य पुरवठा करून शिधापत्रीकेत नोंद असलेल्या प्रत्येक व्यक्ती करीता मोफत महीना ५ कीलो तांदुळ रास्त भाव दुकानातुन देण्यात येणार असल्याचे सांगीतले मात्र तहसिल कार्यालयाकडे जिल्हा प्रशासनाकडुन तालुक्यात असलेल्या अंत्योदय योजनेतील ४२४९ व अन्नसुरक्षा योजनेतील २०२३३ शिधापत्रीकांमध्ये नोंद असणाऱ्या एकुण १, ०८, ९६५ नागरीकांसाठी धान्य पुरवठा करण्यात आला असुन शेतकऱ्यांच्या ५३७१ शिधापत्रीकेतील २४, ९३५ नागरीकांचे धान्य सध्या आले नसल्याने शेतकरी शिधापत्रीकांमधील नागरीक या मोफत धान्यापासुन वंचीत राहण्याची भिती निर्माण झाली आहे.
एकीकडे शासनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की,कोरोना प्रादुर्भाव संकटाच्या काळात कोणाचीही अन्नविना उपासमार होऊ नये, असे शासनाचे निर्देश आसताना देखील तीन महिने रेशन दुकानातून माल उचलला नाही. त्यांना रेशन दिले जात नाही यावर उपाय म्हणून शासनाने योग्य तो निर्णय घेऊन बंद (एनपीएच) झालेले रेशन कार्ड चालू (पीपीएच) करून त्यांना धान्य देण्यात यावे अशी नागरीकातुन मागणी होत आहे.
केंद्र शासनाच्या रास्त भाव दुकानातील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील शिधापत्रीकांचे धान्य उपलब्ध झाले असुन प्रशासन आदेशाप्रमाणे त्याचे मोफत वाटप सुरू केले मात्र राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या शेतकरी शिधापत्रीकेवरील धान्य जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर त्याचेही मोफत वाटप तातडीने करण्यात येईल. तसेच ज्यांनी तीन महिने रेशन उचलले नाही त्यांना मोफत धान्य मिळणार नाही
मिलींद गायकवाड.. नायब तहसीलदार, पुरवठा वि.






