sawada

Breaking: चर्चेला उधाण:-फैजपूर व परिसरात विको व्हॅनद्वारे होते अवैध गुटख्यांची तस्करी!

Breaking: चर्चेला उधाण:-फैजपूर व परिसरात विको व्हॅनद्वारे होते अवैध गुटख्यांची तस्करी!

“राज्य सरकारने ज्या मुख्य उद्देशाने विषारी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे.त्या उद्देशाला थेट अशा प्रकारे हरताळ फासून, लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे व जीवघेण्या आजारांच्या विळख्यात टाकणारे विविध प्रकारचे गुटख्यांसह तंबाखूजन्य पदार्थची तस्करीचा सुरू असलेल्या गोरखधंद्या बाबत सरकारी यंत्रणेत कार्यरत अधिकाऱ्यांना माहिती नसेल का?कोणाच्या छुप्या पाठींब्या मुळे हा गैर कारभार राजरोसपणे चालत आहे?असे प्रश्न उपस्थित होत आहे”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- यावल तालुक्यात असलेल्या फैजपुर सह परिसरात विमल सह विविध गुटख्याची व तंबाखूजन्य पदार्थ विको व्हॅनच्या मदतीने अवैधरित्या बिनधास्त विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असून,बटाटा चिप्स,पोंगा पंडित,बालाजी सेव चिवडा, आणि गोळ्या-बिस्किटच्या नावाखाली फक्त विमल गुटख्याची विक्री इको व्हॅन द्वारे करण्यात येत आहे. –

याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील फैजपूर शहर व परिसरात अवैध विमल गुटखा विक्री जोमात सुरू असून याला महाराष्ट्र राज्य शासनाने बंदी घातलेली असताना सुद्धा येथे विमल गुटखा सहज विक्री होत असतो.फैजपूर शहर ही मोठी बाजारपेठ असू गटख्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
फैजपूर येथीलच बाहेरपेठ परिसरातील एक व्यक्ती इको गाडीत गोळ्या बिस्कीट,पोंगा पंडित,बालाजी सेव चिवडा, वेफर्स आदीच्या नावाखाली फैजपूर सह साखर कारखाना परिसर,हंबर्डी,हिंगोणा,आमोदा, बामनोद,पडाळसे,भलोद,सह आदी परिसरात इको व्हॅनद्वारे बिनधास्त पणे वाहतूक करून विक्री केली जात असून,असे गैरप्रकार थांबविण्यासाठी सरकारी यंत्रणेत कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती का नाही?कोणाचा तरी छुपा आशीर्वाद या जीवघेण्या विषारी गुटखा विक्रीस असल्या शिवाय हे शक्य नाही?तरी याकडे जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button