Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये”परीक्षा पे चर्चा-६” कार्यक्रम संपन्न…

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये”परीक्षा पे चर्चा-६” कार्यक्रम संपन्न…

अमळनेर पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा -६” या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी अकरा वाजता नवी दिल्ली येथून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समवेत संवाद साधला गेला या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रम दूरदर्शन ,विविध खाजगी माध्यमांवर तथा वाहिनीवर प्रक्षेपण केले गेले. याकरिता आमच्या महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम चावरा वस्तीगृहामध्ये प्रोजेक्टर च्या साह्याने दाखवण्यात आला.यावेळी चावरा वस्तीगृहाचे
संचालक फादर जोसेफ अकरा,ब्रदर फ्रेडी नेलंगल,शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, चावरा वस्तीगृहाचे अधीक्षक राजू सोनकांबळे,केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, सुपरवायझर सुपडू पाटील, पालक विठोबा पाटील, नामदेव महाजन ,सुरेखा पाटील, सुनंदा पाटील, शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन, ,एच.ओ माळी, क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button