सावदा प्रतिनिधी प्रतिनिधी युसूफ शेख
रावेर तालुक्यातील सावदा येथे शरीआ मुस्लिम गव्हर्नमेंट सर्व्हंट को. ऑप.सोसायटीची पहीली वार्षिक सर्व साधारण सभा माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . दीप प्रज्वलन इकरा संस्थेचे अध्यक्ष डाॅ.अब्दुल करीम सालार यांचे हस्ते व उदघाटन इ.एज्यू.सोसा. चे अध्यक्ष हाजी हारून शेख यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणुन डाॅ.अजीत कुमार पाटील, फीरोज खान, पंकज येवले, प्राचार्य सलीम खान, सोहेल खान, हाजी सलीम कुरैशी, अताउल्ला खान, आदिल सर , इकबाल सर, पत्रकार शेख शकील, सुरेश बेंडाळे, नासिर सर, नाजिम शेख, शुभम वानखेडे, बासित उमर आझमी, डाॅ.रईस व असंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.
जिल्ह्यातील जामनेर , पाचोरा, धरणगांव, अमलनेर , रावेर, यावल , जळगांव , भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात कुरान पठणाने अरशद सर यांनी व नात पठण राष्ट्रीय पातळीचे प्रख्यात कवी बासित उमर आझमी यांनी केली. सभेचे प्रस्ताविक पतपेढीचे मुख्यप्रवर्तक गौस खान यांनी मांडले. अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
इकरा संस्थेचे अध्यक्ष डाॅ. अब्दुल करीम सालार यांनी विविध उदाहरणे देउन पतपेढीचे महत्व पटवून दिले. व पतपेढीच्या उज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात
सांगितले की पतपेढीची स्थापना एक ऐतिहासिक पाऊल आहे. पतपेढीची वेळोवेळी मदत करण्यासाठी मी तयार आहे.जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्यात मुस्लिम पगारदार नोकरांची ही पहीली पतपेढी आहे असे सांगितले.
पहील्या वार्षिक सर्व साधारण सभेत खालील प्रमाणे पहिले संचालक मंडळ निवडण्यात आले.
अध्यक्ष – गौस खान हबीबुल्ला खान
उपाध्यक्ष – सै.नफीस अहमद अ.रज्जाक
सचिव – असलम खान गुलाम गौस खान
संचालक- मुजीबुर्रहेमान शेख मुसा
संचालक – शेख अलीम शेख भीक न
संचालक – शेख इलियास शेख अहमद कुरैशी
संचालक – शेख कमालुद्दीन हुसनोद्दीन
संचालक – रईस खान सुब्हान खान
संचालक – जावीद अख्तर शेख हबीब
संचालक – आसिफ खान हफीज खान
संचालक – सै.अफजाल अहमद इकबाल अली
संचालक – शेख रईस न्याज मोहम्मद
संचालक – महेरबान खाॅ मोहम्मद खाॅ
संचालिका – सै.गजाला तबस्सुम असगर अली
संचालिका – अफशां तरन्नुम मुनीर खान
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी व आभार कमाल सर यांनी मानले.
सभा यशस्वीतेसाठी अखतर खान, शफिक सर, मुबारिज सर , ताबिश खान यांनी मेहनत घेतली.
राष्ट्रगीत पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

