जानोरी येथे शेतकऱ्यांचे नुकसान
सुनिल घुमरे
जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक (नाशिक एअरपोर्ट) या ठिकाणाहून आज आपण बाबुराव बोस त्यांच्या शेतामध्ये शेवंती, गुलाब,द्राक्ष आदी पिकांचे झालेल्या कोरोना च्या लाॅक डाऊन मुळे शेतकऱ्याची अवस्था अतिशय गंभीर झाली असल्याची बाब प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
यावेळी बोस यांनी सांगितले की मी गेली चार वर्षापासून द्राक्ष गुलाब सिमला मिरची शेवंती यासारखी विविध पिके पत्नी निर्मला व मी सोबत घरातील परिवार मजूर या सर्वांना घेऊन शेती करतो परंतु मागील काळात नोटबंदीचा फटका त्यानंतर अतिपाऊस नंतर पून्हा अवर्षण व आता कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जगभरात देश-विदेशात तसेच इतर राज्यात महाराष्ट्रात जाणारी आमची शेवंती गुलाब द्राक्ष यासारख्या पिकांची मार्केटिंग व्यवस्था पूर्णता बंद असल्या कारणाने तयार झालेला माल फुले कुठे पाठवायचा व तो घेण्यासाठी कोण घराच्या बाहेर निघणार त्यातच या रोगाला प्रतिकार म्हणून लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याने कोणताही नागरिक किंवा व्यापारी घराच्या बाहेर पडणार नसल्याकारणाने शेतात आलेल्या या ठिकाणची 100% नुकसान झाले असून एक शेतातील शेवंती पूर्णता ट्रॅक्टरने टाकले आहे तर जीव मी शेती फुले तोडणीला आली असताना व्यापारी पेठ सर्व मंदिरे बंद उठावनाही असल्या कारणाने बँकेकडून घेतलेले कर्ज कसे खेळायची व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच आपल्या शेतीवर असलेल्या मजुरांचा उदरनिर्वाह कशाप्रकारे करायचा या विवंचनेत असून देशावरील हे संकट आमच्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णता संपला असून अशाही परिस्थितीत शहरांमध्ये लोक आपल्या गाडीवर गाठोडे बांधून घराकडे परतताना दिसत आहे मात्र शेतकरी बांधव दरवाजा दरवाजा वर फिरून व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमाल विक्री साठी नेऊन त्यातूनकाहीतरी होईल आशेने दिवसभर शेतात राबून हा माल पोचण्याचा धंदा करत आहे मात्र आजची परिस्थिती गंभीर झाली असुन शेती साठी किंवा फुलशेती चे कर्ज फेडण्यासाठी काय करायचे बॅका थांबत नाही तेव्हा काय असा प्रश्न निर्माण झाली आहे व यांत शासनाने योग्य तो मार्ग काढावा अशी विनंती प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.






