Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना च्या नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर..!पहा काय आहे नियमावली..!

?जळगांव Live.. कोरोना च्या नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर..!पहा काय आहे नियमावली..!

जळगांव जिल्हा कार्यक्षेत्रात कोकिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या रोकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 16/02/2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत.

तसेच जळगांव जिल्हयात करोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गत अधिक होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे आणि सदर संशयित व्यक्तीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती जळगांव जिल्हयात उद्भवू नये यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1997 व फोजदारी प्रक्रिया संहिता,
1973 चे कलम 144 अन्वये संपूर्ण जळगांव जिल्लयाकरीता करोना विषाणू (कोहिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून दिनांक 22/02/2021 ते दिनांक 06/03/2021 पावेतो खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे

1) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे.

2) अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ 50 % क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील.

3) सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी राहील.

4) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 10 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्थ या सारख्या
विधीकरीता खुली राहतील.

5) सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क्स, बगीचे, नाटयगृहे. प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.

6) सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रमे यांना बंदी राहील. तसेच सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.

7) सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

8) कायद्याव्दारे बंधनकारक असणान्या वैधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील.( तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील.) मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या
मर्यादेतून सूट राहील.

9) लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या निबंधांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी.

10) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर यायाधींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील.
तसेच कोविड-19 ची लक्षणे दिसून येणा-या संशयित कर्मचा-यांची कोविड-19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

11) जळगांव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता, सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे, सर्व व्यक्तींनी चेह-यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सीगचे पालन करणे तसेच सॅनिटाईनरक
वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील, सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रिटेलर्स (किरकोळ व्यापारी) प्रवेश असणार नाही. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव व सर्व सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधित बाजार समितीच्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन कोविड-19 नियमावलीचे पालन होत असल्याची खात्री करावी.

12) संपूर्ण जळगांव जिल्हयात रात्री 10.00 वाजेपासून सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) घोषित करण्यात येत आहे. मात्र या संचारवंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे
कामगार ( तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील), बाहेर गावाहून येणाऱ्या
प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील.
13)गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रेली यांना बंदी राहील. मात्र केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल.

सदरचा आदेश हा सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी
पारीत करण्यात येत आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाथ ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव
2. पोलीस अधिक्षक, जळगांव
3. आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव
4. कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि जळगांव
5. उपविभागीय दंडाधिकारी सर्व
6. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव
7. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगांव
8. कार्यकारी दंडाधिकारी सर्व
9. जिल्हा शल्य चिकीत्सक जळगांव
10. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगांव
11. जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगांव
12. जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव
13. सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जळगांव
14. शिक्षणाधिकारी (माध्यमिक प्राथमिक), जि प जळगांव
15. मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपंचायत सर्व
16. सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button