Jalgaon

Jalgaon Live: मुख्यमंत्र्यांच्या भाषणा आधीच लोक उठून जाऊ लागले.. नेत्यांना भाषणे आवरती घ्यावी लागली..! पहा व्हिडीओ…

Jalgaon Live: मुख्यमंत्र्यांच्या भाषणा आधीच लोक उठून जाऊ लागले.. नेत्यांना भाषणे आवरती घ्यावी लागली..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठून जायला लागले. लोक निघून जात असल्याचं पाहून गुलाबराव पाटील यांनी त्यांचं भाषण आवरतं घेतलं. भाजप नेते गिरीश महाजनही मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. गिरीश महाजन यांनाही कार्यकर्ते निघून जात असल्यामुळे भाषण आवरतं घ्यावं लागलं. गिरीश महाजन यांनीही जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली.

वेळ फार कमी आहे. आमच्या माता भगिनींना घरी जायचं आहे, त्यांची चलबिचल दिसत आहे. त्यामुळे गुलाबरावांनी भाषण आटोपतं घेतलं, मी पण आटोपतं घेतो, असं गिरीश महाजन म्हणाले.

प्रमुख नेत्यांनी भाषण आटोपतं घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली. ‘इथे आणणलेली माणसं भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असतानाही इतका जनसमुदाय आला आहे,’ असं एकनाथ शिंदे भाषणाच्या सुरूवातीलाच म्हणाले. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला.

PROMOTED CONTENTorn Between 1965-1990? Get 1.5 Cr T

‘चंद्रकांत मला अनेकदा भेटायचा आणि रडायचा, मी ऐकून घ्यायचो, कारण ऐकणारा मी एकटाच होतो. आता तुला घाबरायची गरज नाही. हा खरा एकनाथ तुझ्यामागे खंबीरपणे उभा आहे. एका आमदाराला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आधीचे एकनाथ हात धरून मागे लागले होते, मात्र हा एकनाथ हात धरून चालेल,’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button