Pandharpur

पंढरपूर मा लक्ष्मण भाऊ शिरसाट यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान

पंढरपूर मा लक्ष्मण भाऊ शिरसाट यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर दि 8 आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू झाले हा दिवस आज पत्रकार दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो हेच डोळ्यापुढे ठेवून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट नगरसेवक विक्रम भैया शिरसाट यांनी शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान सत्काराचे आयोजन केले होते. प्रथम विविध पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदाधिकारी यांचा सत्कार केला तसेच सर्व सर्व पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला
या यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट यांची व शहरातील पत्रकारांची जणू नाळच जोडली गेलेली असल्याने सतत पत्रकारांच्या पाठीशी व त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात पत्रकार हा नेहमी धावपळीमध्ये असल्याने स्वतःच्या कुटुंबाकडे थोड्या प्रमाणात का होईना पण दुर्लक्ष करून समाजाच्या शहराच्या विकासासाठी सतत वृत्तपत्रांमध्ये अनेक विषयांची मांडणी करतात तसेच शहरातील बरेच राजकीय नेते मंडळींना आपली बातमी लागली पाहिजे आपण प्रसिद्धी झालो पाहिजे तर काही राजकीय मंडळी फक्त चमकोगिरी करणे यातच दंग असतात परंतु पत्रकार दिनाच्या शुभेच्छा ही पत्रकाराला देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो एक राजकीय मंडळाचे आमच्या बाबतीत दुर्दैवच म्हणावे लागेल यात मात्र शंका नाही
अनेक वर्षापासून रखडत असलेला पत्रकार भावनांचा प्रश्न तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी मुंडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र जाधव आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी तात्पुरता का होईना पण पत्रकारांना पत्रकार भवन बनण्यासाठी नगरपरिषदेची जागा भव्य हॉल देऊन सुसज्ज असे सध्यातरी पत्रकार भवन म्हणून आम्ही त्यामध्ये वावरत आहोत
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी पत्रकार होण्यासाठी सोयीसुविधा साठी प्रयत्न केला आहे हे आम्ही विसरून चालणार नाही यापुढेही आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मण भाऊ शिरसट म्हणाले की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे नूतन बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसाट यांनी पत्रकारांचे कोणत्याही प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बरोबर आहोत यावेळी बरेच पत्रकार सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button