Latur

जळकोट तालुक्यातील घोणसी गावच्या बेघरांचा श्रमिक क्रांती व एकल महिला संघटनेकडून कडुन प्रस्ताव दाखल.

जळकोट तालुक्यातील घोणसी गावच्या बेघरांचा श्रमिक क्रांती व एकल महिला संघटनेकडून कडुन प्रस्ताव दाखल.

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र व एकल महिला संघटनेच्या वतीने दि.9/12/2020 रोजी घोणसी ता. जळकोट येथील 216 बेघरांच्या मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आसुन सदरचा प्रस्ताव मा.तहसिलदार जळकोट,व मा.गटविकास आधिकारी जळकोट यांचेकडे सादर करण्यात आला आहे.बेघर लोकांना गाव विस्तार योजने अंतर्गत सरकारने मोफत जागे द्यावे अशी या संघटनांनची आग्रही भुमिका आसुन बेघर लोकांना जागे मिळवून देण्याकरीता श्रमिक क्रांतीच्या च्या वतीने उदगीर तालुक्यातील नळगीर, बेलसकरगा,व घोणसी या गावच्या बेघरांच्या जागा मागणीचे प्रस्ताव याआदोगर दाखल करण्यात आले आहे. तसेच धोंडिहिप्परगा, नावंदी, कोदळी पिंपरी, येथील बेघर लोकांनी ही या योजने अंर्तगत जागे मिळवुन द्यावे म्हणून या संघटनांकडे मागणी केली असल्याची विश्वासनिय माहीती कळविण्यात आली आहे,दर दहा वर्षांला या योजनेच्या पात्र लाभार्थीयांचा शोध घेऊन जागे मिळवून देण्याची कार्यवाही प्रशासन यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे परंतु प्रशासकीय आधिकार्यांच्या उदासीनतेमुळे या महत्वपूर्ण योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या संघटनेने मागणी लावुन धरली आहे बेघरांना आधार निर्माण करुन देणारी ही योजना आसुन या योजनेच्या लाभार्थीयां च्या यादी सह व ग्रामसभेच्या ठरावानीशी श्रमिक क्रांती अभियान चे जळकोट तालुका आध्यक्ष बालाजी आदावळे यांच्या नेतृत्वाखाली जागा मागणीचा हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे,यावेळी संघटनेचे प्रमुख मारुती जयवंतराव गुंडीले यांचेसह संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मण रणदिवे,लक्ष्मण जाणतीने,चौतराताई नवाडे,शांताबाई गव्हाणे, मिराताई मालुसरे, सुनिता सुकणे, अंजली नवाडे पंचुबाई आदावळे,सुनिता डावळे,शोभाबाई जाणतीने,शेषाबाई भागाये,प्रणीता पाटील,सत्यकला पाटील, रंजना मालुसरे,इत्यादी सह चाळीस बेघर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button