गिरणा नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू
महेश शिरोरे
देवळा:- गिरणा नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता २५) दुपारी तीनवाजे दरम्यान देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे घडली.
कल्पेश बाळासाहेब देशमुख (वय १८, रा लोहोणेर) असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तो लोहोणेर येथील जनता विद्यालयात लोहोणेर येथे महाविद्यालयातील शिक्षण घेत होता. तो व त्याचे मित्र शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास लोहोणेर येथील गिरणा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. कल्पेश नदीतील खोल पाण्याचा अंदाज न अल्याने तो बुडाल्याची बातमी समजताच परिसरातील ग्रामस्थांनी धावाधाव करून कल्पेश ला बाहेर काढुन पुढील उपचारसाठी ग्रामीण रुग्णालय देवळा येथे नेले परंतु तोवर त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले..पुढील तपास देवळा पोलीस करत असून लोहणेर परिसरात कल्पेश च्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.






