Amalner

? Big Breaking…अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान… शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना द्यावा न्याय..

?अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना द्यावा न्याय..अमळनेरकाल संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी गारपीट झाली.बेधुंद वादळ,गारपिट आणि जोरदार पाऊस यामुळे अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रब्बीच्या हंगामातील सर्व पिके जमिनदोस्त झाली असून अगोदरच आर्थिक मंदीच्या झपाट्यात आणि दुष्काळाच्या सावटाखाली असलेला शेतकरी बांधव पूर्ण पणे हवालदिल झाला आहे. रब्बीच्या हंगामातील सर्व पिके कालच्या पावसाने नष्ट केली आहेत.गहू,बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आंबा जो थोडा फार मोहरला होता सर्व मोहर गळून पडला आहे.

संजय शालीक पाटील ,तळवाडे,ता अमळनेर यांच्या शेतातील मका
संजय शालीक पाटील ,तळवाडे,ता अमळनेर यांच्या शेतातील मका…
आधीच कोरोना मुले मुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यात हे अस्मानी संकट कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी मोठं मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.अनेक छोट्या छोट्या झोपड्यांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडून गेले तर काहींच्या घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत.या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरी,गरीब गरजू जनतेला त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी आणि सामान्य जनतेकडून होत आहे.? Big Breaking...अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान... शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना द्यावा न्याय..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button