मालेगांवी काळ्या बाजारात जाणारा रेशन चा तांदुळ जप्त,
“३ लाख ९५हजार मुद्देमालासह दोघांना अटक, दोन फरार”
नाशिक जिल्हा प्रतिनिधी-शाताराम दुनबळे
नाशिका-मालेगाव येथे कोरोना महामारीत देखील काही रेशन
दुकानदार गरीब व गरजवंतांना वितरीत
करावयाचे धान्य काळ्या बाजारात विकून आपले
उखळ पांढरे करुन घेत आहेत. काल विशेष
पोलिस पथकाने असेच रेशनचे सुमारे लाखाचे
धान्य-तांदूळ परस्पर धुळ्यातील व्यापाऱ्यास
विकून त्याची वाहतूक करण्याचा प्रकार
उघडकीस आणला.याप्रकरणी रेशन दुकान
सेल्समन व वाहन चालकास अटक केली असून
धुळे येथील धान्य खरेदीदार व्यापारी वाहन
मालक फरार झाला आहे. रेशनचे धान्य व वाहन
असा ३लाख९५हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग व अपर
पोलीस अधिक्षक मालेगाव संदीप घुगे यांच्या
मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा.पोलीस
निरीक्षक सागर कोते, पो.शि. तुषार आहिरे,
पो.शि. अभिजीत साबळे, पो.शि. दिनेश शेरावते
तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी रणजीत
रामाघरे एस.एस.शिन्दे यांनी दिनांक 28
सकाळी ११ वाजेच्या सुमारास दरेगाव जवळील,
महामार्गावरील स्टार हॉटेलच्या पाठीमागे
मालेगाव येथे मोहम्मद युनुस मोहम्मद याकुम ।
वाहन चालक राहणार मिल्लत नगर धुळे, नवीद
आलम मोहम्मद आमीन (सेल्समन द हॅन्डलुम
को.ऑपरेटीव्ह सोसायटी स्वस्त धान्य दुकान
क्र.११ मालेगाव) रा.हजार खोली मालेगांव,यांना
रंगेहाथ रेशनिंग धान्याचा काळाबाजार करतांना
पकडले.तर वाहन मालक इब्राहीम रशीद
खाटीक रा. धुळे आणि व्यापारी महेश(पुर्ण नाव
समजले नाही) रा.धुळे फरार झाले आहेत. हे
सर्वजण जिवनावश्यक स्वस्त धान्य दुकानातील
धान्याचा अपहार करून वाहतुक करतांना मिळून
आले.९६ हजार रू किमतीचा तांदुळ (६० पोते
प्रत्येकी ५० किलो वजनाचे) व ३ लाख रू.
किंमतीची पिकअप वाहन असा एकुण
३,९६,००० मुद्देमालास�मिळून आल्याने त्याच्या विरुध्द पवारवाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५कलम ३ व ७,व मोटार वाहन कायदा कलम १९२ तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ३व४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..






