Maharashtra

दिव्याची नाहीतर सध्या दव्याची व जेवणाची गरज आहे

प्रतिनिधी लक्षमन कांबळे

दिव्याची नाहीतर सध्या दव्याची व जेवणाची गरज आहे

टाळी थाळी वाजवल्या वर व दिवा बॅटरी लाईट बंद केल्यावर तर या संसर्गजन्य कोरोना पासून आपली सुटका होईल का या आशेने खेडेगावात घरा घरात दिवे लावून बॅटरी लावून व लाईट बंद करून प्रतिसाद दिला खरे पण
आज रोजी जनतेला दिव्याची नाहीतर जेवणाची गरज आहे.

परदेशातून आलेली संसर्गजन्य कोरोना रोगाने आपल्या भारत देशात थैमान घातले असून यात दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत असले मूळे संपुर्ण देशात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत
या संसर्गजन्य कोरोना पासून बचावासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करताहेत व जनतेने स्वतःला लॉकडाऊनकरून घेत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत आहेत.
पण आपल्या भारत देशाच्यास प्रधानमंत्री यांनी डॉक्टर पोलीस नर्सेस सरकारी कर्मचारी सफाई कामगार हे आपल्या साठी सेवा देत आहेत म्हणून याची आपण त्यांची कृतज्ञता म्हणून टाळी व थाळी वाजून त्यांची संबंध देशातील जनतेने कृतज्ञता व्यक्त केली.
तर पाच एप्रिल ला दिवा बॅटरी लाईट बंद करून दिवे लावण्याचे आव्हान हे देशातील जनतेला एक अभूतपूर्व सल्ला दिला सरकार व जनतेने कोरोना रोगाशी सामूहिक लढा दिला आहे असे उद्गार प्रधानमंत्री यांनी केले
खरच या कोरोना संसर्गजन्य रोगा पासून आपणाला सुटका होईल का ??
आपल्या देशाच्या जबाबदार प्रधानमंत्री यांनी खरतर दवाखान्यात सुविधा कश्या वाढवता येतील डॉक्टर कसे वाढवता येतील जनतेला कामधंदा नसलेमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे यावर उपाय योजना ची आमल बाजवणी करून आलेल्या आपत्तीतून बाहेर काढायचे सोडून थाळी टाळी दिवे लावणे बॅटरी लावणे हे असले नुस्के जनतेच्या हिताचे नसून हे नुस्के जनतेला अंधश्रद्धेच्या वाटेने घेऊन जात असल्याचे संकेत आहेत.
सध्या जनतेला दिव्याची नाहीतर दव्याची व जेवणाची गरज आहे असे जनतेतून ऐकायला मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button