रोटी फाउंडेशन तर्फे हूडकेश्वर येथील गोरगरीबाना अन्नदान वितरण
प्रतिनिधी अनिल पवार
चांपा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र जिल्हाबंदी असल्याने या लॉकडाऊनच्या काळात गावोगावी फिरणारे आदिवासी पारधी समाजाची मोठी पंचाईत झाली .त्यांना आहे त्या ठिकाणी थांबणे आवश्यक असल्याने नागपूर शहरातील हूडकेश्वर पोलिस स्टेशनच्या मागील परिसरात झोपड्या तयार करून राहणाऱ्या पारधी समाजातील नागरिकांना मिळेल त्यात आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते .
राज्य व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊन केले .त्यामुळे गावात व इतरत्र फिरून मिळेल त्यातच उदरनिर्वाह करायचे आता जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने पारधी समाजावर उपासमारीची वेळ आली आहेत .
शहरात त्यांना कोणी मदत करीत नसल्याचे रोटी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ . रोहित दादा माडेवार , यांच्या निदर्शनास येताच रोटी फाउंडेशन च्या कार्यकारी अध्यक्ष सौ. टिशा रोहित माडेवार , नेकी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.अशरफ अली साहेब , श्री. डांगे साहेब , तसेच सोबत श्री. रितेश केला, संदिप वैद्य , सौ.अर्चना केला , व इतर मित्र परिवार यांनी त्यांना अन्नदान वितरण केले .याबद्दल सर्वत्र रोटी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ . रोहित दादा माडेवार यांचे कौतुक होत आहेत .






