Maharashtra

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व आरोग्य विभाग अमरावती यांच्या वतीने कोरोना व्हायरस मुळे लॉकडाऊन स्थितीत गरजूंना मोफत जेवनाचे डबे

अमरावती ग्रामीण

कामधंदा नाही म्हणुन चुल पेटली नाही,असं अमरावती कापुसतळणी मध्ये होणार नाही.
लॉकडाऊन च्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील गावात सर्व कामकाज ठप्प झाल्याने अनेक गरजु नागरिकांना जेवणाची सोय करणे अडचण ठरत आहे. म्हणुन संपूर्ण भारत देशांत तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व गावात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत च्या अमरावती जिल्हा पदाधिकारी च्या वतीने गरजु लोकांना दोन्ही टाइम जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्याकरिता धारा १४४ चे उल्लंघन होऊ नये म्हणुन रहिमपूर चि.पोलीस स्टेशन ठाणेदार शेख साहेब (आपत्ती वेवस्थापन समिती कापुसतळणी)यांच्या परवानगी ने २८ मार्च २०२० पासुन जवळपास २४ पेक्षाही अधिक गरजु वृद्धांना गाडगेबाबा रोटी अभियान राबऊन घरपोच डब्बा देण्याचे कार्य चालू आहे.
गोरगरीब,अर्थसहाय्य लोकांना मदत करण्याकरिता या उपक्रमात गरजुंना दोन्ही वेळ ची जेवणाची व्यवस्था पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे अमरावती उपजिल्हा प्रमुख श्री.प्रतिकभाऊ मळसने तसेच संस्थेचे अमरावती जिल्हा पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने व अमरावती जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी गाडगेबाबा रोटी अभियान राबविताना कोरोनाचा प्रसार होनार नाही याची जाण ठेवावी असा सल्ला ठाणेदार शेख साहेब, ग्रामविकास अधिकारी कथलकर साहेब, सरपंच सुनील भाऊ सरदार यांनी दिला.
सदर उपक्रम पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे अमरावती उपजिल्हा प्रमुख प्रतिकभाऊ मळसने,आरोग्य सेवक अरुणभाऊ शेवाने,सौ.दीपालीताई सातवटे,पद्माताई तराळे,ममताताई गिरनाळे, प्रदीपभाऊ सातवटे,वसंतराव बाणाईत,अजय शिराळकर,प्रशांतभाऊ सरदार,राहुल बाबनेकर,संजयभाऊ हिंगे,गजानन काकड,इरफान हुसेन,कमलकिशोर शेंडे,गजानन भागवत,मयुर हरणे,दीपक आठवले,निरंजनभाऊ ताजने यांच्या माध्यमातून राबविला जात आहे. अमरावती शहरातील गरजूंनी यांच्याशी संपर्क करावा असे पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थे मार्फत सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button