Amalner: न प अग्निशामक दलाने प्राचीन विहिरीत पडलेल्या मांजरीच्या पिलाला दिले जीवदान..दोन तासाचे रेस्क्यू ऑपरेशन झाले यशस्वी..!
अमळनेर (प्रतिनिधी) पुरातन विहिरीत पडलेल्या मांजरीच पिल्लू अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या टीमने सुमारे दोन तास रेस्क्यू ऑपरेशन
राबवून सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले.
विशेष म्हणजे तब्बल 16 तास विहिरीत राहिलेलं हेमांजरीच पिल्लू जिवंत बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
अमळनेर येथील न्यू प्लॉट भागात व्यापारी प्रकाशचंद पारख यांचा हा वाडा असून याठिकाणी डॉ.दीपक धनगर यांचे सिद्धीविनायक हॉस्पिटल आहे. या वाड्यात जुनी विहिरी असून या विहिरीत मांजरीच पिल्लू पडल्याची माहिती जितेंद्र पारख यांना मिळाली त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर अग्निशमन विभागाचे प्रमुख नितीन खैरनार यांना कळविले.
नितीन खैरनार यानी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची परवानगी घेऊन तातडीने विहिरीजवळ धाव घेतली. मात्र रात्रीचा अंधार झाला असल्याने विहिरीत उतरणे
शक्य झाले नाही मात्र सकाळी 9 वाजेलाच टीम पुन्हा घटनास्थळी हजर झाली. यावेळी त्यांच्या मदतीसाठी जितेंद्र पारख, सामाजिक कार्यकर्ते पराग ताथेड इ उपस्थित झाले होते.
अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनानुसार फायरमन दिनेश बिहाडे,
जफर पठाण, फारुक शेख, मच्छिंद्र चौधरी, परेश उदयवाल, आनंदा झीबल यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले,दिनेश बिहाडे हे स्वतः जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले व पिलाला बाहेर काढले.
यावेळी बिथरलेल्या पिल्लाने बऱ्यापैकी त्यांच्या हाताला चावाही घेतला मात्र जखमी होऊनही त्यांनी पिल्लास न सोडता बादलीत टाकून वर काढले. या कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत असून दिनेश बिऱ्हाडे हे नेहमीच त्यांच्या कार्यत्परतेबद्दल ओळखले जातात.






