अमळनेर तालुक्यातील नागरिकांना ठोस प्रहारचे विनम्र आवाहन…प्रशासनाच्या सादेला प्रतिसाद द्या…सहकार्य करा…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
संपुर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील नागरिक मात्र पाहिजे तसे सहकार्य प्रशासनाला करत नसल्याचे गेल्या संपूर्ण 25 दिवसांत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करत असताना निदर्शनास आले आहे. अनेक लोक अधिकारी परत फिरताच पुन्हा गर्दी करतात,तोंडाला मास्क बांधत नाही,सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही,विनाकारण घरा बाहेर पडतात,चौका चौकात घोळक्याने उभे राहतात असे चित्र पहावयास मिळत आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना ठोस प्रहार च्या संपूर्ण टीम कडून एकच विनंती आहे की घरात रहा,नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा.घाबरून जाऊ नका.. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका,आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या… सामाजिक अंतर ठेवा,चेहऱ्याला मास्क लावा..नियमांचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य करू नका. आपणच आहोत आपल्या सुरक्षित जीवनाचे शिल्पकार…????






