Bollywood: हेल्मेट न घातल्याबद्दल अमिताभ आणि अनुष्कावर पोलिसांची कारवाई…!
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. अनोळखी व्यक्तींबरोबर केलेल्या बाइक राइडवरून दोघांनी सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र हिच बाइक राइड अनुष्का आणि बिग बी यांना चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावर दोघांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना यावर नाराजी व्यक्त करत तक्रार केली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर लक्ष घालून बिग बी आणि अनुष्का शर्मावर कारवाई केली आहे. दोघांनी विना हेल्मेट प्रवास केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या शुटींगस्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीची मदत मागितली आणि त्याच्या बाइकवर डबल सीट बसून गेले. तर इतके अनुष्का देखील तिच्या बॉडीगार्डबरोबर विनाहेल्मेट बाइक बसली. विना हेल्मेट बाइकवर डबल सीट बसून दोघेही रस्त्यावर येताच दोघे लोकांच्या कॅमेरात कैद झाले. मात्र आता दोघांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
बिग बी आणि अनुष्का शर्मानं विना हेल्मेट प्रवास केलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी आम्ही या प्रकरणी ट्रॅफिक ब्रांचला कळवले असल्याचं सांगितलं. बिग बींनंतर अनुष्का शर्माचा देखील व्हिडीओ समोर आला. तो व्हिडीओ शेअर करत एका युझरनं थेट मुंबई पोलिसांना टॅग करत हेल्मेट कुठेये? असा प्रश्न विचारला
अमिताभ बच्चन सध्या सेक्शन 84 च्या शुटींगमध्ये बिझी आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रिभु दासगुप्ता यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मा चकदा एक्सप्रेस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाक आगेय भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.






