sawada

सावदा न.पा.चे गटनेता अजय भारंबे यांना अपात्र करा

सावदा न.पा.चे गटनेता अजय भारंबे यांना अपात्र करा

जिल्हा अधिकाय्रांकडे विरोधीगटातील चार नगरसेवकांनी तक्रार द्वारे केली मांगणी

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सत्ताधारी गटाचे गटनेते, नगरसेवक अजय भागवत भारंबे यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे. अशी तक्रार अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी,रा. काँ. नगरसेवक व विरोधी गटनेता फिरोज खान पठान, नगरसेवक राजेश वानखेडे, सिध्दार्थ बडगे अशा चार नगरसेवकांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केली आहे. यामुळे सत्ताधारी विरुद्ध, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पद अपात्र करण्याचे युध्द पेटले आहे. यापूर्वी सत्ताधारी गटनेते अजय भारंबे यांनी अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे यापूर्वीच केली आहे. यामध्ये दोन्ही नगरसेवक रडार वर आहेत. पदाचा गैरवापर केल्याने दोघांनी एकमेकांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याने शहरात एकच चर्चेला उधाण आले आहे.

शहरात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जनता त्रस्त बनलेली असून येथील नगरपालिकेतील सत्ताधारी गटनेते अजय भारंबे यांचा स्वार्थासाठी पदाचा गैरवापर समोर आला आहे. परिणामी गटनेते नगरसेवकाने पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात थोडक्यात असे की, येथील गटनेते, नगरसेवक अजय भारंबे हे सन २०१६ पासून नगरसेवक आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांचे वडील भागवत अवसू भारंबे यांचे नावावर असलेली एकत्रित कुटुंबनुसार सावदा न पा कडे भू-अभिन्यास मंजूर केलेला आहे. भू-अभिन्यास मंजूर करताना त्यांनी न पा ला १०० रूपयांचे स्टँमपेपर वर लिहुन दिलेले आहे की, सदरच्या भु-अभिन्यासामध्ये मी गटारी चे बांधकाम करून देईल. व त्या स्टँमपेपर मध्ये माझे वारसदार जबाबदार राहतील. असे लिहून दिलेले आहे. सदरील भु-अभिन्यासावर १० लाखाच्या वर वसुली रक्कम असून संबंधित मालकाने न पा कडे जमा करावी म्हणून न पा मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार भु-अभिन्यास मालकाचा मुलगा अजय भागवत भारंबे नगरसेवक आहे. तो सत्ताधारी गटाचा असल्याने आजपावेतो नगरपालिकेची थकबाकी भरण्यास तयार नाही. त्यामुळे या जमिनीवर न पा चे नाव लावण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी कर-अधिक्षकांना दिलेला आहे. त्यामुळे यावरून सिद्ध होते की, अजय भारंबे यांनी पदाचा दुरूपयोग केलेला आहे.
तसेच अजय भारंबे हे नगरसेवक आहेत व वडील भागवत अवसु भारंबे यांनी एकत्रित कुटुंब पध्दतीने एकत्र असलेली सावदा शिवारातील जमीन गट नंबर १३१/ पार्ट हे नोव्हेंबर २०१९ पासून न पा हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे. सदरील जमिनीवर भु-अभिन्यास मंजूर करते वेळी ओपन स्पेस मोकळी जागा व रस्ते दाखविण्यात आले आहे. परंतू या ओपन स्पेस जमिनीवर शेतीची पेरणी करून उत्पन्न घेण्यात येत आहे. त्यामुळे पीता पुत्रांनी संगनमत करून ओपन स्पेस व रस्ताची जागा हडप केल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक भारंबे यांनी पदाचा गैरवापर करून जागा हडप केल्यामुळे त्यांनी पदाचा दुरूपयोग केलेला असल्याने त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 ग (ह) , 44 (ब), 16(3) अ , नुसार अपात्र करण्याची लेखी तक्रार केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button