Maharashtra

श्री काळ भैरवनाथ गुरू गादी ने सामाजिक बांधिलकी जपत केली १०१ गरजु कुटुंबांना मदत

श्री काळ भैरवनाथ गुरू गादी ने सामाजिक बांधिलकी जपत केली १०१ गरजु कुटुंबांना मदत

प्रतिनिधी सुरेश बागडे

सोनारी येथे आज दि. ०८ रोजी हनुमान जयंती च्या शुभ मुहुर्तावर श्री काळ भैरवनाथ गुरू गादी मठातर्फे गुरु गादीचे मठाधिपती महंत पीर श्री शामनाथजी महाराज यांच्या कडुन १०१ गरजु लोकांना धान्य देण्यात आले.

संपूर्ण जगात कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी च्या काळात ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा लोकांना काम नसल्याने उपासमार होऊ नये या मुळे श्री महंत पीर शामनाथ महाराज यांच्या हस्ते गरजु १०१ कुटुंबांना ज्वारी, गहु, तांदुळ, साखर, तेल आशा अत्यावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले, यावेळी सोशल डिस्टिंगचे काटेकोर पालन करण्यात आले होते.

यावेळी श्री भैरवनाथ गुरू गादी चे मठाधिपती श्री महंत पीर शामनाथजी महाराज,नवानाथजी महाराज, संगमनाथजी महाराज, रामस्वरूपनाथ महाराज, सोनारी चे उपसरपंच अंगद फरतडे, भैरवनाथ अन्नछत्र चे अध्यक्ष महेश कारकर, रवींद्र गुळमीरे, अशोक गुळमीरे, बापू शेलार, नितीन गाढवे, भैरू खुळे तसेच भैरवनाथ अन्नछत्र चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button