Maharashtra

मासिक बैठकीच्या नावाखाली बोलावून आशा स्वयंसेविकांना काढायला लावले गवत

मासिक बैठकीच्या नावाखाली बोलावून आशा स्वयंसेविकांना काढायला लावले गवत.

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव :- प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे ता.चाळीसगाव जि.जळगाव अंर्तगत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना वैद्यकीय अधिकारी आज दि.२४ जुलै रोजी यांनी मासिक बैठकीच्या नावाखाली आरोग्य केंद्रात एकत्र बोलविले आणि स्वतः गैरसमज राहिले. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी बैठक नुकतीच नावालाच घेत आलेल्या आशा स्वयंसेविकांना आरोग्य केंद्राच्या परिसरातील वाढलेले गवत काढायला लावले.
गवत काढण्यास आशा स्वयंसेविकांनी विरोध केला असता तुम्ही गवत न काढल्यास तुमचे ह्या महिन्याचा कामाचा मोबदला (मानधन) मिळणार नाही, अशी धमकी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी यांनी या प्रमाणे आशांकडून गवत काढण्याचे काम करून घेतल्यामुळे समाजात आशांची प्रतिमा खराब झाली आहे. परिणामी प्रचंड नाराजी पसरली आहे. वास्तविक पाहता आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारी असताना आशांकडून अशा प्रकारे धमकावून काम करून घेणे योग्य आहे का ?आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आलेला निधी कुठे गेला ? कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून बैठक घेतल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय अधिकारी यांनी द्यावीत आणि वरिष्ठांनी याबाबत चौकशी करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सह जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button