Maharashtra

कुही पोलिसांकडून गरजूना जीवनावश्यक वस्तूचे पाकिट वाटप

प्रतिनिधी अनिल पवार

कुही पोलिसांकडून गरजूना जीवनावश्यक वस्तूचे पाकिट वाटप

चांपा

कोरोना संसर्ग प्रसाराचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे चांपा ग्रामपंचायत हद्दीत झोपडपट्टी करून मध्यप्रदेश , आसाम , झारखंड , आदी परराज्यातून कामानिमित्त आलेल्या मजुरांना याचा फटका बसला आहे .लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही , शिवाय मूळ गावी परत जाता येत नसल्याने त्यांच्यावर व सोबतच कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली .

चांपा परिसरात राहणाऱ्या परराज्यातून आलेल्या मजुरांवर व गावांतील गोरगरीब कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू अन्नधान्याची गरज असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी प्रशासनाला मदतीचे आवाहन केले .

सरपंच अतिश पवार यांनी ग्रामपंचायत हद्दीतील परराज्यातून कामानिमित्त आलेल्या मजुरांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन लगेच
सरपंच अतिश पवार यांनी कुही पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना माहिती दिली .ही बाब लक्षात घेऊन कुही पोलिस स्टेशन अंतर्गत पाचगाव पोलिस चौकीचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांना माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप त्या कुटुंबियांना करण्यात आले.

उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायत हद्दीत मध्यप्रदेश , आसाम , झारखंड , आदी परराज्यातून कामानिमित्त आलेल्या मजुरांना लॉकडाऊनमुळे येथील २०ते२५ मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत .त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला याबाबत समजताच ठाणेदार कमलेश सोनटक्के यांनी पोलिस ठाण्यातर्फे अडकलेल्या मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे पॉकिट वितरण करण्यात आले .नागरिकांच्या सेवेसह गरजूना मदतीचा हात देणाऱ्या पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत .यावेळी उपस्थित सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के , सरपंच अतिश पवार , उपसरपंच अर्चना सिरसाम , विजय अरतपायरे ,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button