Amalner

Amalner: सिनेमात जे आहे ते तुमच्या घरात सुरु आहे…. रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

सिनेमात जे आहे ते तुमच्या घरात सुरु आहे…. रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

अमळनेर- जीवनात आपण चुका करतो. हे माहित असतांनाही त्या दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा चूका का होतात. क्रोध वाईट आहे. हे माहित असतांनाही पुन्हा क्रोध का करतात ! पूर्वी घरात जे सुरु होते.त्यावर सिनेमा निघायचा आता सिनेमात जे आहे ते तुमच्या घरात सुरु आहे. असे परखड मत रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी मांडले.ते रत्नप्रवाह प्रवचनमालेचे अकरावे पुष्प गुंफतांना अमळनेर येथे बोलन होते. प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी यावेळी उपस्थित होत्या.
“या चुकांपासून दूर राहा” या विषयावर बोलतांना त्यांनी पाच चूका सांगितल्या 1)नेव्हर मिस अंडरस्टँडिंग2) मिस गाईड 3)नो मिस युज 4)मिस ट्रस्ट 5) मिस बिव्हेयअर
1)नेव्हर मिस अंडर स्टँडिंग – गलत फॅमिली मध्ये राहू नका.धर्माच्या क्षेत्रात गलत फॅमिली आहे. दु:खी माणूसच साधू होतो असे नाही.तर उच्चविद्या विभूषीत माणसं ही साधू होऊ शकतात. आई वडिलांनी काय केले याचा हिशेब करू नका. बुद्धी, तर्क, अंहकार बाजुला ठेवता, जिथे तुम्ही कोणतेही आर्ग्युमेंट करीत नाही. असे एखादे ठिकाण आहे का तुमच्या जवळ.घरातील आवारा मुलांना नियंत्रित करा. परिवारातील धक्के सहन होत नाही.
2)मिस गाईड करू नका – एका घरात अंधार व दुसऱ्या घरात उजेड त्याला न्याय म्हणतात. परंतु दोन्ही घरात उजेड त्याला समाधान म्हणतात.एक सिगारेट प्यायला काय हरकत आहे. हे मिस गाईड आहे. मजा करा हे मिस गाईड आहे.काम सगळ्यासाठी करा परंतु शब्द व वचन कोणाला देऊ नका.
3) नो मिस युज- डोळे, कान, नाक, संपती इत्यादींचा तुम्ही दुरूपयोग करू नका. मोबाईलचा दुरुपयोग खूप मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तुम्हांला राम बनण्यासाठी जीवन दिले रावण का बनतात ? तुम्हाला काही धाक राहिलेला नाही.
4) मिस ट्रस्ट – तुमच्यावर कोणी उपकार केले असतील तर त्यांच्या प्रति अविश्वास करू नका. काही माणसं स्वतःची किमंत स्वतःच ठरवित असतात. हृदय देण्यासाठी एखादा पत्ता आहे तुमच्या कडे ? गुरुदेवांमध्ये शक्ती आहे यांच्याकडून घ्या.
5)मिस बिव्हेयअर- तुमचे वर्तन चांगले हवे. तुमच्या अनुपस्थित तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमची प्रशंसा करतात का ? तुम्ही डोळे मिटण्याच्या आत तुमच्या नेचर वर सिग्नेचर करणाऱ्यांची संख्या किती आहे ? किमान परिवार तरी तुमच्या नेचर वर सही करेल का ? असा रोखठोक सवाल प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी श्रोतू वर्गाला केला. अमळनेर येथील मिडटाऊन हॉल येथे प्रवचनास स्त्रि,पुरुषांची प्रचंड गर्दी होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button