देह वेचावा कारणी’ या आत्मकथा पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यास खा.डॉ.भारती पवार यांची उपस्थिती..
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
आदरणीय डॉ.बाळासाहेब विखे पाटिल जी यांनी लिहिलेल्या राजहंस प्रकाशित “देह वेचावा कारणी” या आत्मकथा पुस्तकाचा विमोचन सोहळा आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नामविस्तार समारोह सोहळा प्रवरा, अहमदनगर येथे संपन्न झाला. या विमोचन समारोह देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांनी ऑनलाईनद्वारे करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाढते कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनीटायझर आणि योग्य दुरी ठेवण्याचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून खा.डॉ.भारती पवार उपस्थित होत्या. मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील आदी राजकीय, सामाजिक, धार्मिक तथा अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.






