Amalner

?️ अमळनेर कट्टा… जिल्हापरिषद अंतर्गत ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग यासाठी 6 कोटी 20 लाख रुपयांच्या कामास मंजुरी, अमळनेर तालुक्यातील 3 रस्त्यांचा समावेश.

?️ अमळनेर कट्टा… जिल्हापरिषद अंतर्गत ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग यासाठी 6 कोटी 20 लाख रुपयांच्या कामास मंजुरी, अमळनेर तालुक्यातील 3 रस्त्यांचा समावेश.
अमळनेर : जिल्हापरिषद अंतर्गत ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग यासाठी 6 कोटी 20 लाख रुपयांच्या कामास ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिली असून अमळनेर तालुक्यातील 3 रस्त्यांचा त्यात समावेश आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही मंजुरी दिली असून आमदार अनिल पाटील यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लेखाशिर्ष 3054-2419 अंतर्गत निधी मंजूर करण्यात येतो. जिल्हा परिषद जळगाव यांच्या संदर्भाधीन क्र.५ येथील प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद जळगाव करिता गट (ब) मधील रु. 6 कोटी 20 लाख किंमतीच्या कामांस परिशिष्ट क्र. 1 व 2 अन्वये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील रामा.15 ते दहिवद रस्ता ( ग्रामीण मार्ग 81) या नवीन कामासाठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर दुसरा कळमसरे ते शहापूर या नवीन कामासाठी (ग्रामीण मार्ग 3 ) यासाठी 40 लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. तर तिसरा मंगरूळ ते फाफोरे रस्ता (ग्रामीण मार्ग- 23 ) नवीन काम यासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या रस्त्यांना प्राधान्याने समावेश केला यामुळे हे काम सुरू होऊन सध्या नादुरुस्त व कच्चे असलेले रस्ते पक्के होतील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतातून वाहतूक करण्यासाठी हे रस्ते महत्वाचे ठरणार आहेत तर दुसरीकडे शॉर्टमार्ग ढेकू रोड ते धुळे रोड मंगरूळ जवळ निघणार आहे आहे. यामुळे वाहनधारकांना नवा मार्ग मिळणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button