अमळनेर तालुक्यातील नदी काठच्या आठ गावांना उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार यांनी केले सतर्कतेचे आवाहन.
आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार ज्योती देवरे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी .
अमळनेर प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा (पांझरा नदी) धरणातुन संपूर्ण एकुण-17 दरवाज्यांतून आज दि,5 जुलै रोजी दुपारी 38,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे .सदर विसर्ग जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नदी काठच्या आठ गावांपर्यंत पोहचणार असल्याने धोकाग्रस्त- मांडळ, मुडी,बोदरडे,कळंम,ब्रह्मणे,भिलाली,शहापूर,निम(कपालेश्वर) या गावांना पुराच्या पाण्याचा धोका असल्याची दाट शक्यता असल्याने मा,जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार जोती देवरे, जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिग रावळ, हे शोध बचाव साहित्यासह वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक (सर्पमित्र)-सतिष कांबळे,स्कायलेब डिसुजा,शीतल शिरसाळे, जळगावचे-मनपा- अग्निशमन दलाचे अश्वजित घरडे,प्रकाश चौव्हान,तेजस जोशी, यांच्या पथकासह वरील गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन ग्रामस्थांना वाढणाऱ्या पुरापासून बचाव व सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कतेचा व सावधानतेच्या सूचना तसेच गावातील शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था पाहत आहे, तसेच अतिदक्षतेच्या दृष्टीने वरील यंत्रणा आज रात्रभर शोध व बचाव पथकासह या भागात गस्त घालत असून दक्षता घेत राहणार आहे.







