Kolhapur

वत्सलाबाई ज्यूनियर कॉलेजमध्ये लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम संपन्न

वत्सलाबाई ज्यूनियर कॉलेजमध्ये
लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम संपन्न

सुभाष भोसले,कोल्हापूर
लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत वत्सलाबाई ज्युनियर काॅलेज गारगोटी येथे लेखक सुनील रंगराव देसाईं यांना निमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या पर्यवेक्षेका सौ.दीपलता या होत्या.यावेळी लेखक सुनील रंगराव देसाईं यांनी आपल्या स्वप्न कादंबरी च्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत बनतो,त्याचा आत्मविश्वास वाढतो जीवनात येणाऱ्या संकटाचा तो आत्मविश्वासपूर्वक सामना करू शकतो असे त्यांनी प्रतिपादन केले. मोबाईल च्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकाचे वाचन करावे ,मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकव्यात असे आवाहन ही त्यांनी केले.जीवनात स्वतःला सुसंस्कृत घडविण्यासाठी वाचन आवश्यक आह.आधुनिक जगात वाचनाचा छंद मुलांनी जोपासावा.महान व्यक्तीचीं चरित्र्ये वाचावीत त्यांचे अनुकरण करावे असे मार्गदर्शन त्यांनी विदयार्थ्यानां केले
यावेळी प्रा.एस.पी.मोरे,प्रा. सौ गवस , प्रा. सौ.टिकारे उपस्थित होते.सूत्रसंचालन एस.पी.मोरे यांनी केले. आभार सौ.गवस यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button