Amalner

पीक विम्याचे हप्ते भरूनही पीक विमा मंजूर न झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी आणि माझ्याकडे लेखी तक्रार आणून द्यावी असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

पीक विम्याचे हप्ते भरूनही पीक विमा मंजूर न झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी आणि माझ्याकडे लेखी तक्रार आणून द्यावी असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

प्रतिनिधी नूरखान

तालुक्यातील काही संगणक सेवा केंद्रांवर 2019 चा पीक विम्याचे हप्ते घेताना अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पावत्या देण्यात आल्या मात्र तो पैसा विमा कंपनीकडे भरलाच नाही यावर्षी आमदार अनिल पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कापूस पिकाचा विमा मंजूर करून घेतला गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विमा रक्कम मंजूर झाली आहे मात्र संगणक सेवा चालकांनी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम परस्पर हडप केल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱयांची संख्या मोठी आहे.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी आमदारांकडे धाव घेतली परंतु विमा कंपनीला हप्त्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नोंदी कंपनीकडे नसल्याने विमा मिळू शकत नाही सुमारे साडे तीनशे शेतकर्यांच्या कोट्यवधी रुपयांचा विम्याचे नुकसान झाल्याने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाकडे दाद मागावी लागेल म्हणून आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन केले असून तालुका कृषी अधिकारी व आमदार कार्यालयात एक एक प्रत द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच दरवर्षी पीक विमासाठी कापणी प्रयोगाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने पारदर्शी प्रयोग घेण्याबाबत शिबिरही घेण्यात आले आहे त्यामुळे ही जबाबदारी आता स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक व शेतकऱ्यांवर आहे, यंदा शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button