Jalgaon

? आताची मोठी बातमी..ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार जिल्हाधिकारी अभिजित राऊत… अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार जिल्हाधिकारी अभिजित राऊत अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविली

रजनीकांत पाटील जळगांव

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने (Offline Mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळही 30 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावाधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्यास 23 डिसेंबर, 2020 पासून सुरवात झाली. 30 डिसेंबर, 2020 अशी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

या कालावधीत संगणक प्रणालीत राज्यातून 3 लाख 32 हजार 844 एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना 28 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी, तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button