Bollywood

आणि नोरा झाली ट्रोल…हिला हाडांच्या डॉ कडे न्या..!

आणि नोरा झाली ट्रोल…हिला हाडांच्या डॉ कडे न्या..!

मुंबई नुकतीच बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलेली आणि कमी वेळात लोकप्रिय झालेली नोरा फतेही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.ती तिच्या बोल्ड लूक आणि फोटोमुळे देखील सतत चर्चेत असते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असते.तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वरून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.

नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे असून हातात काळ्या रंगाची एक बॅग आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

तिच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीवरून तिला ट्रोल केलं जातंय. एक नेटकरी म्हणाला, ‘ती दररोज अशी उभी कशी राहू शकते?’.तर दुसरा म्हणाला, ‘तिच्या पॉश्चरमध्ये काही गडबड आहे.’ आणि तिसऱ्याने कमाल करत ‘हीला हाडांच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे’,अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नोराला ट्रोल केले आहे. कामाच्या बाबतीत म्हणाल तर नोरा लोकप्रिय अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button